40.1 C
Madhya Pradesh
May 18, 2024
Bundeli Khabar
Home » एमजी मोटर इंडियाचा महाराष्ट्रात विस्तार,चेंबूरमध्ये नवीन विक्री सुविधा केंद्राची सुरुवात
व्यापार

एमजी मोटर इंडियाचा महाराष्ट्रात विस्तार,चेंबूरमध्ये नवीन विक्री सुविधा केंद्राची सुरुवात

संतोष साहू/महाराष्ट्र
मुंबई : देशभरातील कार खरेदीचा अनुभव समृद्ध करण्याची आपली वचनबद्धता अधोरेखित करत एमजी मोटर इंडियाने आज मुंबईतील चेंबूर येथे नवीन विक्री सुविधा सुरू करण्याची घोषणा केली आहे. संपूर्ण शहरातील अधिकाधिक ग्राहकांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी एमजी मोटर्सने ही सुविधा सुरू केली आहे।


महाराष्ट्रातील प्रीमियम एसयूव्हीसाठी बाजारपेठेची क्षमता ओळखून, नवीनतम शोरुम द्वारे हा ब्रँड अश्वासित सेवा प्रदान करतो आणि भविष्यातील ग्राहकाभिमुख सेवेचे आश्वासन देतो. तर त्याचा ब्रिटिश वारसा ही ठशठशीतपणे सांगतो. सध्या एमजी मोटर महाराष्ट्रात एकूण ३७ टचपॉइंट चालवतो आणि २०२१ च्या अखेरीस राज्यात आणखी ४३ टचपॉइंटपर्यंत विस्तारकरण्याची योजना आखत आहे. या ब्रॅंडची संपूर्ण भारतात सध्या एकूण २८० टचपॉइंट केंद्रे आहेत. २०२१ च्या अखेरीस पॅन-इंडिया रिटेल उपस्थिती ३०० टचपॉइंटपर्यंत वाढविण्याचे कंपनीचे उद्दीष्ट आहे।


एमजी मोटर इंडियाचे सीओओ गौरव गुप्ता म्हणाले, “एमजी चेंबूरचे सुविधा केंद्र महाराष्ट्रातील संभाव्य ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विस्तार योजनेतील महत्वाचा दुवा आहे. या सुविधेमुळे शहरातील संभाव्य ग्राहकांना विक्री, सेवा, सुटे भाग आणि ॲक्सेसरीजसह सर्व गरजा उपलब्ध होतील.”
एमजी चेंबूरचे डीलर प्रिन्सिपल श्री पवन आयल्ससिंघानी म्हणाले, “एक अग्रगण्य आणि भविष्यातील ब्रँड म्हणून, एमजीने आपल्या नाविन्यपूर्ण, तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनांच्या पाठीवर भारतीय ऑटोमोटिव्ह स्पेसमध्ये आधीच नावलौकिक मिळविले आहे आम्हाला या ब्रँडबरोबर भागीदारी करताना आनंद होत आहे आणि चेंबूरमधील ग्राहकांना नवीन आणि अद्वितीय ऑटोमोटिव्ह रिटेल अनुभव देण्यासाठी एमजीचा समृद्ध ब्रिटिश वारसा आणि टेक फोकसचा फायदा घेणार आहे.”।

Related posts

एमजी मोटर इंडिया हरित और स्थायित्वपूर्ण दृष्टिकोण वाली ऑटोमोटिव कंपनी बनी

Bundeli Khabar

आयुष्मान खुराना बने गोदरेज के ब्रांड एम्बेसडर

Bundeli Khabar

गोदरेज अप्लायन्सेसला ‘एज अल्टीमा – स्टीलनॉक्स’ वॉशिंग मशीनसाठी मिळाला सीआयआय डिझाईन एक्सलन्स पुरस्कार २०२१

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!