28.5 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » देशातील ८२% विद्यार्थी प्रत्यक्षात शाळेत जाण्यास उत्सुक: ब्रेनली
महाराष्ट्र

देशातील ८२% विद्यार्थी प्रत्यक्षात शाळेत जाण्यास उत्सुक: ब्रेनली

संतोष साहू/महाराष्ट्र
मुंबई : देशातील ८२% विद्यार्थी आता प्रत्यक्षात शाळेत येण्यास उत्सुक असल्याचे ब्रेनली या जगातील सर्वात मोठ्या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. या सर्वेक्षणात शाळा पुन्हा सुरू होण्याच्या संदर्भात आणि साथीच्या रोगानंतरच्या परिस्थितीत ऑनलाइन शिक्षणाचे भवितव्य यावर विद्यार्थ्यांच्या भावनांवर प्रकाश टाकण्यात आला आहे

ब्रेनलीचे सीपीओ राजेश बिसानी यांनी सांगितले की, “भारतीय विद्यार्थ्यांनी घरातूनच अभ्यास करण्याच्या वातावरणाशी चांगले जुळवून घेतले असले, तरी ते प्रत्यक्षात वर्गात परत जाण्यास उत्सुक आहेत. हे स्पष्ट दिसते की कोणतेही तंत्रज्ञान मैत्री आणि संवादाची जागा घेऊ शकत नाही. ६१% विद्यार्थ्यांनी असाही दावा केला की त्यांना प्रत्यक्षात वर्गात पाठविण्यास त्यांचे पालक अनुकूल आहेत. हे सकारात्मक पाऊल आहे.”

शाळा योग्य सुरक्षा खबरदारी घेत आहेत: सर्वेक्षण केलेल्या ७९% विद्यार्थ्यांना असे वाटते की, शाळेत परतत असताना त्यांच्या शाळा इमारतींमध्ये आवश्यक खबरदारीचे सर्व उपाय करीत आहेत. निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांनी (५५%) नमूद केले आहे की त्यांच्या शाळेनुसार प्रत्यक्ष वर्गात उपस्थिती नोंदविणे अनिवार्य आहे.याचा अर्थ असा होतो की, देशातील अनेक प्रदेशांमध्ये साथीच्या रोगांचे निर्बंध कायम असताना अनेक शाळा अजूनही ऑनलाइन शिकण्याचा मार्ग स्वीकारत आहेत कारण ते सावधगिरीच्या बाजूने चूक करु इच्छित नाही. किंबहुना, ८२% विद्यार्थ्यांनी नमूद केले आहे की त्यांच्या शाळा अजूनही शिकण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करतात.

विद्यार्थी आणि शाळा एडटेकवर अवलंबून: आता विद्यार्थ्यांनी केवळ ऑनलाइन प्लॅटफॉर्मशी जुळवून घेतले नाही तर या माध्यमात भरभराट केली आहे. ७७% विद्यार्थी त्यांच्या शाळा पुन्हा सुरू झाल्यानंतरही ब्रेनलीसारख्या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मकडून मदत घेत आहेत यात आश्चर्य नाही. शिवाय, बहुसंख्य विद्यार्थ्यांना (७५%) त्यांच्या शाळांनी नजीकच्या भविष्यासाठी शिकण्याच्या हायब्रीड मॉडेलचे अनुसरण करावे अशी इच्छा असेल. साथीच्या रोगामुळे होणाऱ्या लॉकडाऊनदरम्यान विद्यार्थ्यांना घरातून शिकत राहणे हाच एकमेव पर्याय होता. आता शाळा पुन्हा सुरू होत असतानाही ऑनलाइन सोबत राहणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. या सर्वेक्षणात असे नमूद करण्यात आले आहे की, मोठ्या संख्येने विद्यार्थी शारीरिक शिक्षणाकडे परत येऊ इच्छित असले, तरी तितक्याच भरीव गटाला शिकण्याची हायब्रीड पद्धत कायमची स्वीकारण्याची इच्छा आहे.

Related posts

विधायक जी का निरीक्षण

Bundeli Khabar

कुसंग, व्यसन, सिनेमा, फेसबुक, व्हाट्सएप एवं फैशन से आज की युवा पीढ़ी भटक रही है : बीके भगवान भाई

Bundeli Khabar

वांद्रे शासकीय वसाहतीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!