34.2 C
Madhya Pradesh
May 18, 2024
Bundeli Khabar
Home » शहर व सिडको परिसराला उद्या पाणीपुरवठा होणार नाही
महाराष्ट्र

शहर व सिडको परिसराला उद्या पाणीपुरवठा होणार नाही

प्रमोद कुमार/महाराष्ट्र
औरंगाबाद : शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या 100 दलली योजनेच्या 1299
मीमी व्यासाच्या अशुद्ध उद्धरन वाहिनीवर जायकवाडी येथील नवीन पंपगृह नजीक वेल्डिंग निखळल्याने मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झालेली आहे .सदर गळतीचे ठिकान नवीन योजनेच्या विद्युत सब स्टेशन लगत आहे .गळती अचानक वाढून पाणी सब स्टेशन मध्ये गेल्यास मोठ्या प्रमाणात हानी होऊन पाणी पुरवठा खंडित होईल.त्याचप्रमाणे मोठ्या स्वरूपातील पाणी व्यय लक्षात घेता सदरील गळतीच्या दुरुस्तीकरिता शुक्रवार दि 27 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11.00 वाजे पासून नवीन योजनेवर खंडणकाळ घेण्यात येणार आहे .
याच खंडणकाळात फारोळा फाटा येथील स्कावर व्हॉल्व्ह मधील गळती दुरुस्त करणे ,नक्षत्रवाडी एम.बी.आर .येथील 2 गळत्या दुरुस्त करणे ,जालाननगर येथे 2 एअर व्हॉल्व्हचे पाईप बदलणे तसेच रेल्वे क्रॉसिंग नजीक 1400 मीमी व्यासाच्या गुरुत्व वाहिनीवर असलेली गळती बंद करणे ही कामे देखील केली जाणार आहेत.याशिवाय जायकवाडी ते शहरापर्यंत नवीन योजनेवरील पंपिंग मशिनरी दुरुस्ती तसेच विद्युत विषयक कामे देखील यांत्रिकी विभागामार्फत करण्याचे नियोजन आहे।


वरील सर्व कामांसाठी मुख्यत्वे 1299 मिमी व्यासाची जलवाहिनी रिकामी करणे ,दुरुस्ती नंतर जलवाहिनीमध्ये पाणी भरून घेणे यासह वरील कामांसाठी साधारणतः 12 तासाचा कालावधी लागणार आहे .या खंडण काळामुळे उद्या शुक्रवार दि 27 /8/2021 रोजी शहर व सिडको परिसराला पाणी पुरवठा होणार नाही.यामुळे शहराचा पाणी पुरवठा एक दिवसांनी पुढे ढकलण्यात आला आहे .कामाची अत्यावश्यकता लक्षात घेता काम त्वरित करणे गरजेचे असल्यामुळे या कामासह इतर कामे हाती घेण्यात आली आहेत.करिता नागरिकांना होणाऱ्या गैरसोईबाबत दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे .उपरोक्त परिस्थिती पाहता महानगर पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिका औरंगाबाद यांच्या वतीने करण्यात येत आहे मा कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा महानगरपालिका औरंगाबाद यांच्या प्राप्त माहिती नुसार।

Related posts

मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-5 च्या पथकाने चार कोटी 60 लाख 50 हजार किंमतीचा तब्बल तीन हजार 70 ग्रॅम वजनाचा एमडीचा साठा केला जप्त

Bundeli Khabar

एमजी मोटर ने लॉन्च किया मेटावर्स प्लेटफॉर्म ‘एमजीवर्स’

Bundeli Khabar

नगरसेवक नितीन पाटील यांच्याकडून महाड पूरग्रस्तांना मदत

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!