32.1 C
Madhya Pradesh
May 15, 2024
Bundeli Khabar
Home » मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-5 च्या पथकाने चार कोटी 60 लाख 50 हजार किंमतीचा तब्बल तीन हजार 70 ग्रॅम वजनाचा एमडीचा साठा केला जप्त
महाराष्ट्र

मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-5 च्या पथकाने चार कोटी 60 लाख 50 हजार किंमतीचा तब्बल तीन हजार 70 ग्रॅम वजनाचा एमडीचा साठा केला जप्त

राकेश चौबे
मुंबई : मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-5 च्या पथकाने कुर्ल्यात ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई केली. दोघा ड्रग्ज तस्करांना पकडून चार कोटी 60 लाख 50 हजार किंमतीचा तब्बल तीन हजार 70 ग्रॅम वजनाचा एमडीचा साठा जप्त केला. एक 29 वर्षांचा तरुण मोठ्या प्रमाणात एमडीचा साठा घेऊन कुर्ला पश्चिमेकडील एल. बी. एस रोडवर असलेल्या बोहरा कब्रस्थान येथे येणार असल्याची माहिती युनिट-5 चे अमंलदार प्रमोद पाटील यांना मिळाली.

त्यानुसार प्रभारी निरीक्षक घनश्याम नायर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर, अजित गोंधळी, एपीआय जयदिप जाधव, उपनिरीक्षक संजय यादव तसेच घाडगे, विचारे, निर्भवणे, चिलप, पाटील, सिंग आदींच्या पथकाने त्याठिकाणी सापळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार तो तरूण तेथे येताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली.
त्याच्याजवळ तब्बल तीन हजार 70 ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्जचा साठा मिळून आला. धारावीत राहणारा शिरिष धडके असे त्याचे नाव असून त्याच्याकडे ड्रग्जबाबत अधिक चौकशी केली असता त्याने हे एमडी वांद्र्यात राहणाऱ्या व ड्रग्जची तस्करी करणाऱ्या दिलीप खरटमोल याच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक बाबीचा अभ्यास करून खरटमोल याला देखील पकडले. युनिट-5 चे पथक याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Related posts

स्वास्थ्य विभाग के पेपर लीक मामले में दो लोगो को पुलिस ने किया गिरफ्तार

Bundeli Khabar

सरकार ने सराफ व्यापारी पर एक नया एचयूआइडी कानून थोप दिया

Bundeli Khabar

पवारांच्या वाढदिवशी शिवडी तालुक्यात रक्तदान

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!