22.4 C
Madhya Pradesh
September 13, 2026
Bundeli Khabar
IMG 20210823 WA0049
मनोरंजन

अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना कॅन्सरचे निदान, मुंबईत शस्त्रक्रिया

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
पालघर : सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांना कॅन्सर झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना मूत्राशयाचा कॅन्सर झाला असून नुकतीच मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात त्यांची शस्त्रक्रिया झाली. यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या महेश मांजरेकर यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे. मांजरेकर किंवा कुटुंबीयांकडून अद्याप या वृत्ताला दुजोरा देण्यात आलेला नाही.अभिनेते महेश मांजरेकर यांनी आतापर्यंत मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. मराठीतील अनेक लोकप्रिय आणि दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. आजघडीला मराठीतील एक प्रथितयश दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून महेश मांजरेकर यांचे नाव घेतले जाते. याशिवाय, बॉलीवूडमध्येही महेश मांजरेकर हे नाव सुपरिचित आहे. ‘वॉन्टेड’, ‘रेडी’, ‘दबंग’, ‘जिंदा’, ‘मुसाफिर’ आणि ‘काँटे’ यासारख्या लोकप्रिय बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच महेश मांजरेकर यांनी ‘व्हाईट’ या चित्रपटाची घोषणा केली होती.तसेच बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनला पुढच्या महिन्यात सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. बिग बॉसच्या मराठीच्या पहिल्या दोन्ही पर्वांच्या सूत्रसंचालनाची धुरा महेश मांजरेकरांनी पेलली होती. त्यांच्या अनोख्या शैलीला चाहत्यांची विशेष पसंतीही मिळाली आहे. मात्र आता त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव यात बदल होणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे।


Bundelikhabar

Related posts

‘छैला सन्दू – ए ट्रायबल लव स्टोरी’ 19 नवम्बर को होगी रिलीज

Bundeli Khabar

मिलिंद गाबा और प्रिया बेनीवाल गाबा की रीयल लाइफ केमेस्ट्री ‘शादी करके ले जायेगा मुझे’ में

Bundeli Khabar

विनोद भानुशाली द्वारा प्रस्तुत दीप मनी के गाने ‘तेरा होया दीवाना’ में अदा खान

Bundeli Khabar
error: Content is protected !!