21.6 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेस भिवंडीतून मोठा प्रतिसाद
महाराष्ट्र

कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेस भिवंडीतून मोठा प्रतिसाद

शाही मिरवणुकीतून केंद्रीय मंत्र्यांचे पारंपरिक वेशभूषा धारण करून चौकाचौकातुन केले स्वागत; स्वागतासाठी सर्व पक्षांचे समाजबांधव उपस्तिथ.

भगवानदास विश्वकर्मा/महाराष्ट्र
भिवंडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भाजपाची जनआशीर्वाद यात्रा १६ ऑगस्टपासून जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी केंद्रीय मंत्री कपील पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपा व सर्व पक्षांचे समाज बांधव गुरुवारी भिवंडीत मोठा गाजावाजा करत जन आशीर्वाद यात्रा काढून भर पावसातच आगमन झाले. तरीही कार्यकर्त्यांचा जोश कायम होता. मंत्रिपद मिळाल्यानंतर भिवंडी शहरातील कपिल पाटील यांची ही पहिलिच भेट असल्याने उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळाले. पारंपरिक वेशभूषेतील आगरी कोळी बांधवांनी कोळी गीतांच्या ठेक्यावर नृत्य सादर करून कपिल पाटील यांच्या यात्रेला शुभेच्छा दिल्या।


भिवंडीकरांचे आशीर्वाद घेत कपिल पाटील यांची रांजनोली नाका येथून सुरुवात झाली. साई बाबा मंदिर, टेमघर, अशोकनगर, लाहोटी कंपाउंड, साखरा देवी मंदिर, स्व.आनंद दिघे चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतला, हुतात्मा चौक, एस.टी.स्टैण्ड, वंजारपट्टी नाका, जैन मंदिर, छत्रपति शिवाजी महाराज चौक, तिलक चौक, विट्ठल मंदिर, मंडई, गौरीपाड़ा, धामणकर नाका, पद्मानगर, स्वामी अय्यप्पा मंदिर, वडाला देवी चौक,शिवसेना शाखा कामतघर, गणेश नगर, ब्रम्हानंदनगर, राजीव गांधी नगर, भगवान महावीर चौक, अंजुरफाटा आदि ठिकाणाहून जनआशीर्वाद यात्रा काढण्यात आली. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यासह आमदार महेश चौघुले, भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष शेट्टी, नगरसेवक, मंडळ अध्यक्ष, महिला अध्यक्ष, पदाधिकारी, समाजसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या जनआशीर्वाद यात्रेत सामील होते। भारतीय जनता पार्टी, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यासह विविध सामाजिक संघटनांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम यशस्वी झाला।

Related posts

पिस्तूलमधून गोळी घालत असल्याचा नाट्य रूपांतरित व्हिडीओ ‘इन्स्ट्राग्राम’ द्वारे व्हायरल नवघर पोलिसांची कारवाई

Bundeli Khabar

मोठ्या भक्तिभावाने पाच दिवसांच्या गणरायाला निरोप

Bundeli Khabar

भारताचा एक डाव आणि १३२ धावांनी दिमाखदार विजय

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!