25.5 C
Madhya Pradesh
September 29, 2026
Bundeli Khabar
IMG 20211011 WA0002
महाराष्ट्र

भिवंडी मनपा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचें देयके त्वरीत देण्याची मुन्सीपल कर्मचारी युनीयनची मागणी

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : महानगर पालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे देयके त्वरीत देण्याची मागणी भिवंडी मुन्सीपल कर्मचारी यूनीयनचे अध्यक्ष राजेंद्र काबाडी व सचिव सुनिल वंगार यांनी लेखी निवेदनाद्वारे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे.

महानगरपालिकेच्या सेवेत कार्यरत असणारे कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना आवश्यक ती आर्थिक देयके त्वरीत मिळणे हा त्यांचा अधीकार असताना महानगरपालिकेच्या आस्थापना विभागातील भोंगळ कारभारामुळे त्यांना आस्थापना व भविष्य निर्वाह निधी विभागाचे उबंरठे झिजवावे लागतात तसेच तगादाही लावावा लागतो तरीही ते वेळेवर मिळत नाही तसेच कर्मचाऱ्यांचे वारसा हक्क प्रकरणे शासन परीपत्रकाप्रमाणे ३० दिवसांत निकाली काढणे आवश्यक असताना ६ ते ७ महीने लागत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे तरी या दोन्ही प्रकरणात आयुक्त सुधाकर देशमुख यांनी योग्य निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली असुन आयुक्त काय निर्णय घेतात याकडे सर्वाचें लक्ष लागले आहे.


Bundelikhabar

Related posts

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभाग द्वारा सफाई कर्मचारी व पत्रकारांना रेशन कीट वाटप कार्यक्रमाचे आयोजन

Bundeli Khabar

वुमेन्स वियर स्टोर ‘रसाया’ के उद्घाटन में सुनील पाल, अरुण बख्शी, ज्योति सक्सेना, किशोरी शहाणे, लीना कपूर और रॉनी रॉड्रिग्स पहुंचे 

Bundeli Khabar

स्टार प्लस ची नवीन मालिका ‘आनंदी बा और एमिली’ वर पूर्वे ने पश्चिमेशी लग्न केल्यावर काय होतं त्याचं होणार डीकोडिंग

Bundeli Khabar
error: Content is protected !!