34.2 C
Madhya Pradesh
May 18, 2024
Bundeli Khabar
Home » कोरोना नियमात कोणतीही विशेष कॅटेगरी नाहीये,राजकारणी असो किवा सर्वसामान्य नियम सर्वांना सारखेच-खा. श्रीकांत शिंदे
Uncategorizedमहाराष्ट्र

कोरोना नियमात कोणतीही विशेष कॅटेगरी नाहीये,राजकारणी असो किवा सर्वसामान्य नियम सर्वांना सारखेच-खा. श्रीकांत शिंदे

प्रमोद कुमार/महाराष्ट्र

कल्याण : राजकारणी व्यक्ती असो की सर्वसामान्य, कोरोनाचे नियम हे सर्वांना सारखे आहेत. आणि ते नियम पाळून सर्व गोष्टी करणे आवश्यक असल्याचे मत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले आहे. अप्रत्यक्ष नियामाचे चाललेले उल्लंघन समाज मनावर सावत्र वागणूक असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे , सध्या ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी निघणाऱ्या भाजपच्या जन आशिर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले असून त्याबाबत बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले।

कोरोनाचे नियम सर्वांना सारखे आहेत. कुठेही आपल्याकडून कोरोना पसरवला जाणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. कोरोना नियमांमध्ये कोणतीही विशेष कॅटेगरी नाहीये. मग त्यात लोकप्रतिनिधी असोत की राजकीय नेते किंवा मग आम्ही असू दे. कोरोना नियम मोडले तर आमच्यावरही कारवाई झाली पाहीजे अशी अपेक्षा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली।

तसेच पुढे बोलतांना आपल्या मतदारसंघात मोठ्या गतीने रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्याशिवाय ३८० कोटी रुपये कल्याण डोंबिवली, एमआयडीसीतील रस्त्यांसाठी मिळालेले आहेत. त्याचबरोबर कल्याण – शिळ रोडचे काम प्रगतीपथावर असून पलावा उड्डाणपूल, काटई उड्डाणपूल यांची कामेही मंजूर झाली आहेत. विकासकामे संथगतीने सुरू असतील तर त्यांना गती प्राप्त करून देणे हे लोकप्रतिनिधीची जबाबदारी असून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघाबाबत बोलता आहेत की आपल्या मतदारसंघातील रस्त्याबाबत बोलत आहेत हे माहिती नसल्याचा कोपरखळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी लगावला।

दरम्यान ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यात महापालिका आणि नगरपालिका निवडणूका जवळ आल्याने राजकीय वातावरणात पावसाळ्यात असून सुद्धा गरम होऊ लागले आहे ।

Related posts

नंदुरबार जिल्ह्यातील ऊसतोड कामगार वर्गाला शेतावर जाऊन अनेक संस्थांच्या माध्यमातून मदतीचा हात देणारे कमांडर मनिलाल शिंपी- डॉ. किशोर पाटील

Bundeli Khabar

चित्रकार अक्षय मेस्त्री ग्लोबल गोल्ड आयकॉन अ‍ॅवॉर्डने सन्मानित

Bundeli Khabar

16 अक्टूबर को होगा ‘मिस्टर एंड मिस शाइनिंग स्टार’ शो

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!