27.9 C
Madhya Pradesh
October 5, 2024
Bundeli Khabar
Home » स्वातंत्र्य दिनी कोलीवली येथे १०० वृक्षांची लागवड,।
Uncategorizedमहाराष्ट्र

स्वातंत्र्य दिनी कोलीवली येथे १०० वृक्षांची लागवड,।

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने कोलीवली येथे सीताफळ, मोह, कवठ, बेल इ. १०० झाडांच्या रोपांचे रोपण केले।सध्या आपल्या आजूबाजूच्या परिसरात आणि जगात होणारे नैसर्गिक बदल, हवामानातील बदल, ग्लोबल वॉर्मिग आणि नैसर्गिक आपत्ती यांचा सारासार विचार केला असता, माणसाने निसर्गाकडून खूप काही घेतलं आहे परंतु, माणूस ते निसर्गाला परत करायला काहीसा विसरलाय म्हणून माणसांचा माणुसकीचा धर्म घेऊन, झाडांशी झाडूसकीचे नाते जोडण्याचा झाडे लावण्याचा हा एक लहानसा प्रयत्न महा. अंनिस भिवंडी शाखेने केला आहे।


१५ ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनी हा उपक्रम राबविण्या मागचा उद्देश हाच होता की झाडे लावणे हा सुद्धा देशभक्तीचाच भाग आहे आणि ही देशभक्ती साऱ्यांनीच करायला हवी असे महा. अंनिस भिवंडी शाखेचे कार्याध्यक्ष सुरेश साळवे यांनी म्हटले। इतर दिवशी गैरहजर असणारा पाऊस हा आज नेमका पूर्ण वेळ हजर होता. तरीही या भरपावसात कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने हा उपक्रम राबविला। यावेळी महा. अंनिस भिवंडी शाखेचे सुरेश साळवे, विनोद म्हात्रे, संतोष म्हात्रे, बापूराव मोरे, स्वप्निल भोईर, रुपेश गायकर भुवनेश भोईर, हर्षल भोईर आणि अक्षय भोईर उपस्थित होते।

Related posts

घर में सेंध लगाने वाले गिरोह के पांच लोगों को पुलिस ने किया गिरफ्तार

Bundeli Khabar

मालाड में परमार्थ का रुद्राभिषेक

Bundeli Khabar

क्राइम एन्ड करप्शन कंट्रोल एसोसिएशन कार्यालय का हुआ शुभारंभ

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!