21.6 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » आज वीज कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नाबाबत मुंबई बांद्रा प्रकाश गड कार्यालयावर भव्य धरणे आंदोलन
महाराष्ट्र

आज वीज कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नाबाबत मुंबई बांद्रा प्रकाश गड कार्यालयावर भव्य धरणे आंदोलन

कल्याण : विज कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नाबाबत आज २० ऑक्टो.रोजी वीज महामंडळाचे मुख्य कार्यालय प्रकाशगड बांद्रा मुंबई येथे भव्य धरणे आंदोलन असून महाराष्ट्रातील सर्व वीज कंत्राटी कामगार बंधू आणि भगिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला असून राज्यातील शेकडो कर्मचारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
हे धरणे आंदोलन केवळ आपल्या न्याय हक्कासाठी आहे मागील दोन वर्षे संघटनेने महा विकास आघाडी सरकारचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे सतत पत्रव्यवहार केला व अनेकदा भेट घेऊन सविस्तर चर्चा करावी अशी निवेदने देऊन कंत्राटी कामगारांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या सर्व समस्यां वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे कामगारांचे प्रश्न गांभीर्याने सोडवीत नसून केवळ आश्वासने देत आहेत असे राहुल बोडके ज्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री कंत्राटी कामगारांच्या सर्व समस्यांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत आहेत. कामगारांचे प्रश्न सोडविण्याकरिता शासन व प्रशासनास जाग आणण्यासाठी महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने भव्य धरणे आंदोलन पुकारले आहे.महाराष्ट्रातील सर्व वीज कंत्राटी कामगार बंधू भगिनींनी या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासन आणि प्रशासणास आपली ताकत दाखविण्याचे आवाहन संघटनमंत्री राहुल बोडके यांनी केले आहे.
बोडके यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोहने येथील विज कंत्राटी कामगारांनी मुंबई बांद्रा येथील प्रकाश गडाकडे धरणे आंदोलनाला रवाना झाले आहेत.

Related posts

शरद पवार इनस्पायर फेलोशीपचे निकाल जाहीर; कृषी क्षेत्रासाठी ८० तर साहित्यासाठी १० गुणवंतांची निवड

Bundeli Khabar

नुसरत भरुचा के साथ विनोद भानुशाली और राज शांडिल्य की ‘जनहित में जारी’ की शूटिंग शुरू

Bundeli Khabar

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!