22.4 C
Madhya Pradesh
September 13, 2026
Bundeli Khabar
IMG 20210816 WA00232
महाराष्ट्र

देशाच्या 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गाळेगाव तरे मार्केट येथे ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

Bundelikhabar

संदीप शेंडगे/महाराष्ट्र
मोहोने : भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाले असून या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त सावित्रीबाई महिला मंडळ संस्थेतर्फे गाळेगाव तरे मार्केट येथे मोठ्या उत्साहात ध्वजारोहनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सचिव तथा सावित्रीबाई फुले मंडळ अध्यक्षा लता सिद्धार्थ जाधव, मोहोने ब्लॉक अध्यक्ष काँग्रेस राजेश वाघमारे, मोहोने महिला ब्लॉक अध्यक्षा काँग्रेस वैशाली किशोर वाघ, शारदा दिलीप शिंदे, मंजू यादव, भारती घोडके, इंदूबाई नरवडे यांसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी कार्यक्रमास उपस्थित असलेले सिद्धार्थ जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आज सकाळपासून पावसाचे आगमन झाले असले तरी कार्यकर्त्यांचा उत्साह तसूभरही कमी झाले आला नव्हता. भर पावसात भिजून ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न केला. यावेळी किशोर वाघ, सचिन ढिवर, रोहित कदम, उमेश जयकर तसेच सदर कार्यक्रमास संजय शिंदे, सचिन जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले।

IMG 20210816 WA00233

Bundelikhabar

Related posts

सुनील पाल और अरुणा नाभ की उपस्थिति में माधानी ग्रुप कंपनी के नये ऑफिस का उद्घाटन

Bundeli Khabar

विश्वनाथ वाबळे स्मृती समाजभूषण पुरस्कार

Bundeli Khabar

विधायिका भारती लावेकर ने किया ‘कैमराबाज़’ चैनल का उद्घाटन

Bundeli Khabar
error: Content is protected !!