37.6 C
Madhya Pradesh
May 3, 2024
Bundeli Khabar
Home » गणेशपुरीत मोठया संख्येने तरुणांनी घेतला मनसेत प्रवेश
महाराष्ट्र

गणेशपुरीत मोठया संख्येने तरुणांनी घेतला मनसेत प्रवेश

भगवानदास विश्वकर्मा/ महाराष्ट्र
                 
भिवंडी :राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन भिवंडी ग्रामिण मधील तिर्थक्षेत्र गणेशपुरीतील तरुणांनी आज मोठ्या संख्येने मनसेत जाहीर पक्ष प्रवेश केला. गणेशपुरी ग्रुप ग्रामपंचायतीचा सत्तेचा कालावधी गेल्या महिन्यातच पूर्ण झाल्यामुळे गणेशपुरी ग्रामपंचायतीवर सध्या शासनाचा प्रशासक नेमण्यात आला आहे. सरकार या ग्रामपंचायतींच्या कोरोनाच्या प्रादर्भावामुळे खोळंबलेल्या निवडणुका कधीही जाहीर करू शकतं, आणि या दुष्टीकोणातून मनसेने गणेशपुरीत आपली कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे. याचं पार्श्वभूमीवर गणेशपुरीतील उसगावमधील तरुणांनी मोठ्या संख्येने मनसेत प्रवेश केल्याने ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्याचे दिसून येते.

मनसेचे भिवंडी लोकसभा जिल्हाध्यक्ष शैलेश बिडवी,उपजिल्हा अध्यक्ष विकास जाधव, तालुका अध्यक्ष शिवनाथ भगत, तालुका सचिव शरद नागावकर, तालुका संघटक संतोष म्हात्रे, मनविसे तालुका अध्यक्ष परेश चौधरी आदी वरिष्ठांच्या हस्ते गणेशपुरीतील विभाग अध्यक्ष एडवोकेट सुनिल देवरे यांच्या विभागीय कार्यालयात मोठ्या जल्लोषात हा पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी उपतालुका अध्यक्ष प्रसाद सुवर्णा, उपविभागीय अध्यक्ष प्रकाश मोरे, शाखा अध्यक्ष दिपक पुजारी, सचिव हर्षद खेडेकर, मनोज ठाणगे, शंकर बोस, मोनिष चव्हाण यांच्यासह इतर अनेक गणेशपुरी विभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्तीत होते.
“लवकरच गणेशपुरी ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असून आपल्याला ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवायची आहे, त्याच्या तयारीला लागा. पुढचे ग्रामपंचायत सदस्य तुमच्यातीलच असतील असे  विभाग अध्यक्ष अॅड.सुनिल देवरे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सूचित केले.

गणेशपुरी विभागात पक्षस्थापनेपासून ते आजमितीपर्यंत मनसेने आपला दबदबा अद्यापही कायम ठेवला असून, या भागात नियमित मनसे अनेक सार्वजनिक मुद्दे हातात घेऊन सतत कार्यरत राहते. काल स्वतंत्र दिनाच्या दिवशी गणेशपुरीत जोरदार पक्षप्रवेश करून ही फक्त सुरवात असून, लवकरच संपुर्ण भिवंडी ग्रामीण मनसेमय करू असे जिल्हाध्यक्ष शैलेश बिडवी यांनी यावेळी सांगीतले.

Related posts

गोष्टीपलीकडचे महाभारत’ सारख्या ग्रंथांनी मराठी भाषा समृद्ध होईल – दीपक केसरकर

Bundeli Khabar

बॉलीवुड प्रेस फोटोग्राफर रमाकांत मुंडे को जन्मदिन की बधाई देने पहुंचे दिग्गज

Bundeli Khabar

सावरकर भक्तांचा मेळावा आणि व्याख्यान

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!