21.3 C
Madhya Pradesh
October 27, 2026
Bundeli Khabar
IMG 20210816 WA0014
महाराष्ट्र

बार्शीतुन चोरलेली ब्रिझा कार माढा पोलिसांनी पकडली,आरोपी जेरबंद

Bundelikhabar

संजिव चौधरी/महाराष्ट्र
सोलापुर : बार्शी शहरातील भवानी पेठ येथून मारुती कंपनीची ब्रिझा ही चारचाकी कार चोरुन पलायन करत असताना माढा पोलिसांनी नाकाबंदी करत आरोपीसह गाडी ताब्यात घेतली।
ही घटना माढा शहरात पंधरा ऑगस्ट रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली.
या प्रकरणी अमजद अन्वर शेख वय-३२ वर्ष, रा.बाशींगे प्लॉट, बार्शी यास ताब्यात घेण्यात आले आहे।

माढा पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली की,
मारुती कंपनीची ब्रिझा कार नं. M.H.-13-C.S. 4141 बार्शी शहरातुन चोरीस गेलेली आहे व सदर गाडी माढ्याच्या दिशेने येण्याची शक्यता आहे.
खात्रीशीर माहिती मिळाल्यावर पोलीसांनी तत्काळ माढा शहरातील कुर्डूवाडी बायपास चौक व छ.शिवाजी महाराज चौक येथे नाकाबंदी केली.
12.30 वाचे सुमारास कुर्डूवाडी बायपास चौक माढा येथे पो.हेकॉ. शिंदे, स.पो.फौ. खंडागळे व इतर पोलीस स्टाफ हे वाहन तपासणी करत असताना सदरची  गाडी मिळुन आली।

याप्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता गाडीतील इसमाने आपण ही गाडी भवानी पेठ बार्शी येथुन चोरल्याचे सांगितले।
अमजद अन्वर शेख वय-३२ वर्ष, रा.बाशींगे प्लॉट, बार्शी असे याचे नाव असून गाडी चोरीला गेल्याची तक्रार बार्शी शहर पोलीस ठाण्यात नोंद असल्याची खात्री करत सदर आरोपी माढा पोलिसांनी बार्शी पोलीसांच्या ताब्यात दिला.
ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर बार्शी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक शाम बुवा, पो.स.ई. घोंगडे, स.पो.फौ. खंडागळे, पो.हेकॉ. शिंदे, पो.ना. देशमुख, पो.ना. शिंदे यांनी केली।


Bundelikhabar

Related posts

डॉ.मनीलाल शिंपी यांचा आदर्श नंदुरबार जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा-डॉ. किशोर पाटील

Bundeli Khabar

राज्यातील कामगारांचे प्रश्न न सुटल्यास राज्यभर कामगार रस्त्यावर उतरणार – भारतीय मजदूर संघाचा महामोर्चात निर्धार

Bundeli Khabar

२३ वी राज्यस्तरीय श्रावणी काव्यमैफल व काव्यलेखन स्पर्धा आणि पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

Bundeli Khabar
error: Content is protected !!