29.1 C
Madhya Pradesh
October 18, 2024
Bundeli Khabar
Home » तेरा अनुकंपाधारकांचा जिल्हा परिषदेच्या सेवेत समावेश
महाराष्ट्र

तेरा अनुकंपाधारकांचा जिल्हा परिषदेच्या सेवेत समावेश

तेरा अनुकंपाधारकांचा जिल्हा परिषदेच्या सेवेत समावेश

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या आदेशाने नियुक्ती

प्रमोद कुमार/महाराष्ट्र

ठाणे : मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारी ठाणे जिल्हा परिषदेची अनुकंपा भरती प्रक्रीया यशस्वीपणे राबवून १३ पात्र अनुकंपाधारकांना जिल्हा परिषद अंतर्गत सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांवर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या आदेशाने आज नियुक्ती आदेश देण्यात आले।

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, आरोग्य व बांधकाम समिती सभापती वंदना भांडे, कृषि, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती संजय निमसे, महिला व बाल कल्याण समिती सभापती श्रेया गायकर, समाजकल्याण समिती सभापती प्रकाश तेलीवरें, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य प्रशासन) अजिंक्य पवार यांच्या शुभहस्ते नियुक्तीचे आदेश उमेदवारांना प्रत्यक्ष जाहीर कार्यक्रमात देण्यात आले. सर्वांनी सचोटीने काम करून मिळालेल्या संधीचे सोने करावे अशी अपेक्षा सर्व मान्यवरांनी व्यक्त केली।

जिल्हा परिषदे अंतर्गत सरळसेवा कोट्यातील कनिष्ठ सहाय्यक (लिपीक / लेखा),वरिष्ठ सहाय्यक (लेखा),कंत्राटी ग्रामसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, या पदांवर (संबंधित संवर्गाच्या एकूण रिक्त पदांच्या 20% नुसार येणा-या रिक्त पदांवर) जेष्ठतेनुसार व शैक्षणिक अहर्तेनुसार व त्या पदाकरीता आवश्यक अर्हता विचारात घेऊन 13 पात्र अनुकंपाधारकांना नियुक्ती देण्यात आली. यामध्ये विशाल कंटे, प्रतिभा पवार, प्रशांत वेखेंडे, सबा परवीन मुस्ताक शेख, किरण गोतरणे, सुधीर देशमुख, गौरव शिंदे, प्रशांत यशवंतराव, अमेय पाटील, लिलाकर चवरे, प्रथमेश भोई, माधुरी पाटोळे, दिनेश बागले आदी उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे।

Related posts

रक्षाबंधन दिवशी भव्य वृक्षारोपण “रक्षा वृक्षाची”…

Bundeli Khabar

नेताजींचा भव्य पुतळा इंडिया गेटवर:१२५ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान करणार लोकार्पण

Bundeli Khabar

भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रिडम स्टोरी आयोजित मुक्त काव्यलेखन स्पर्धा उत्साहात संपन्न

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!