37.2 C
Madhya Pradesh
May 15, 2024
Bundeli Khabar
Home » भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रिडम स्टोरी आयोजित मुक्त काव्यलेखन स्पर्धा उत्साहात संपन्न
महाराष्ट्र

भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रिडम स्टोरी आयोजित मुक्त काव्यलेखन स्पर्धा उत्साहात संपन्न

किशोर पाटील/महाराष्ट्र
मुंबई : साहित्य तसेच सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणा-या ” भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रिडम स्टोरी ” या संस्थेच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी व साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रम आयोजित केले जातात.विशेष कौशल्य असुनही समाजपर्यंत न पोहोचू शकलेल्या नवोदित कलाकारांना, लेखकांना ही संस्था आपले कौशल्य सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देते.
याच पार्श्वभूमीवर या संस्थेच्या वतीने ” मुक्त काव्यलेखन ” स्पर्धेचे ऑनलाईन स्वरुपात आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत राज्यभरातूनच नव्हे तर अगदी विदेशामधून देखील मराठी भाषेसोबत नाळ जोडलेले शेकडो स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेचा निकाल दि.३०सप्टेंबर २०२१ रोजी गूगल मीट ॲपव्दारे ऑनलाईन स्वरूपात संपन्न झाला. या ऑनलाईन सोहळ्या दरम्यान भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रिडम स्टोरी च्या ” सराटा ” या ई-बुक चे देखील प्रकाशन करण्यात आले. संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या या बक्षिस वितरण तसेच ई-बुक प्रकाशन सोहळ्याकरीता आपल्या सुमधूर आवाजाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारे सुप्रसिद्ध गायक ॠषिकेश रिकामे, अतिशय कमी वयामध्ये अभिनय क्षेत्रात चमकदार कामगिरी करीत राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले अभिनेते हंसराज जगताप, विकासाची दृष्टी ठेवून तरुणांनी समाजासाठी योगदान द्यावे यासाठी तरुणांपुढे एक आदर्श निर्माण करणारे काकडहिरा ग्रामपंचायत सदस्य कृष्णा जायभाये आणि दिव्यांग भूषण पुरस्कार प्राप्त, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त, ९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातील विशेष निमंत्रित कवी, सुप्रसिद्ध लेखक, गीतकार तसेच या स्पर्धेचे परिक्षक द. ल. वारे इ. मान्यवर उपस्थित होते.तसेच या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका राजश्री मराठे आणि प्रतिमा काळे यांनी केले.
आपल्या कल्पकतेच्या बळावर शेकडो कवी आणि कवियित्रींनी या मुक्त काव्यलेखन स्पर्धेसाठी आपल्या कविता सादर केल्या होत्या. त्यामध्ये रिया रुपेश पवार यांच्या ” तिचा देह ” या सामाजिक कवितेला प्रथम क्रमांक, प्रा. प्रशांत खैरे यांच्या ” कशी भागवू भूक या पोटाची ” या कवितेला द्वितीय क्रमांक, प्रशांत झांबरे यांच्या ” अशी होती रमाई ” या कवितेला तृतीय क्रमांक देऊन गौरविण्यात आले. तसेच सुनिता दहिभाते यांच्या ” चाहूल तुझी लागताच “, मीना राजपूत यांच्या ” तरुणांचं प्रेम “, अंजुम अखिल शेख यांच्या ” आत्मविश्वास “, प्रविण शेवाळे यांच्या ” मी एक चिता ” आणि तनुजा प्रधान यांच्या ” सावल्यांची व्यथा ” या कवितांना उत्तेजनार्थ पारितोषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेकरीता सुप्रसिद्ध लेखक व गीतकार मा.श्री. द. ल. वारे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.
सदर स्पर्धेचे, कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रिडम स्टोरी चे संस्थापक – अध्यक्ष विशाल नामदेव सिरसट, उपाध्यक्ष विजय विष्णू जायभाये, खजिनदार कुसुम विनायक पाटील, महिला अध्यक्षा शिल्पा श्रीकांत मुसळे, सचिव ओंकार हरिश्चंद्र मेहेर व ऋतुजा रुद्रा मिसळे, सह सचिव सिध्दार्थ सुधीर आंबेकर यांनी मेहनत घेतली. प्रसंगी ” नवोदित लेखक, कवी यांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रिडम स्टोरी सातत्याने प्रयत्नशील राहील व संस्थेच्या वतीने वेळोवेळी नवनवीन स्पर्धा, उपक्रम राबविण्यात येतील ” असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

Related posts

आर्थिक मदद मिलने से खुश हुआ परिवार

Bundeli Khabar

“स्वामी” तर्फे कॅन्सरग्रस्तांना ब्लँकेट आणि शिधा वाटप

Bundeli Khabar

निर्माता अभय सिन्हा चुने गए इम्पा के नए प्रेसिडेंट

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!