22 C
Madhya Pradesh
September 1, 2026
Bundeli Khabar
IMG 20210813 WA00092
महाराष्ट्र

दिशादर्शक नाम फलकात अटाळी आंबिवली या गावाच्या नावांचा समावेश करण्याची मनसेची मागणी

Bundelikhabar

मनसेच्या मागणीला मिळाले यश

संदीप शेंडगे/महाराष्ट्र
मोहोने : वडवली उड्डाणपुलाच्या बाजूला लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकावर अटाळी व आंबिवली या गावांच्या नावांचा उल्लेख करून नवीन नामफलक तयार करण्यात यावा ही मागणी मनसेने केली होती।

IMG 20210813 WA00093

वडवली रेल्वे गेट जवळ बनविण्यात आलेल्या उड्डाणपूलालगत महानगर पालिकेने दिशादर्शक नामफलक लावला होता त्यात केवळ मोहोणे टिटवाळा आणि वडवली या तीनच गावांचा उल्लेख करण्यात आला होता ही बाब मनसेचे उपशहर अध्यक्ष रुपेश पाटील यांच्या निदर्शनास आली. त्यांनी ९ ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त व नगररचना विभाग शहर अभियंता कार्यकारी अभियंता प्रकल्प शहर वाहतूक शाखा व अ प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन त्या नामफलकात अटाळी आंबिवली या गावांचा उल्लेख करावा अशी मागणी केली होती व याबाबत संबंधित अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा केला।

IMG 20210813 WA00094

या मागणीची दखल घेऊन १२ ऑगस्ट रोजी केवळ तीन दिवसांत कारवाई होऊन नामफलकवर आज वडवली आणि अटाळी हे नाव टाकण्यात आले असून सदर बोर्डावर जागा नसल्याने पाऊस थांबला की नवीन नामफलक लावण्यात येणार आहे त्या नवीन बोर्ड वर आंबिवली हे नाव टाकण्यात येईल असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे।


Bundelikhabar

Related posts

डॉ सूरज माटे को मिला एम्पावर सोशल एंड एजुकेशन ट्रस्ट द्वारा बिजनेस आइकॉन अवार्ड

Bundeli Khabar

पु. ल. कला महोत्सव २०२२चे आयोजन

Bundeli Khabar

अंबरनाथ येथील समाज सेवक शिक्षक विलास आंग्रे यांना कोरणा योद्धा पुरस्काराने सन्मानित

Bundeli Khabar
error: Content is protected !!