39.3 C
Madhya Pradesh
May 18, 2024
Bundeli Khabar
Home » डॉ. शांताराम नाईक यांचे आकस्मिक निधन
महाराष्ट्र

डॉ. शांताराम नाईक यांचे आकस्मिक निधन

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. शांताराम बाबुराव नाईक (निवृत्त) यांचे आज दिनांक १९ ऑगस्ट २०२२ रोजी कांदिवली येथील राहत्या घरी ह्रदय विकाराच्या तिव्र धक्क्याने निधन झाले.
८ नोव्हेंबर १९५९ रोजी जन्मलेल्या डॉ. शांताराम नाईक यांचे अभ्युदय नगर येथील शिवाजी विद्यालयात शालेय शिक्षण झाले होते. तर एल्फिन्स्टन महाविद्यलयात त्यांनी बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले होते. किंग एडवर्ड मेमोरिअल हॉस्पिटल (के. ई. एम.) आणि शेठ गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज येथून त्यांनी एम. बी. बी. एस. पर्यंत वैद्यकीय शिक्षण घेतले. पुढे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यात रूजू झाले.
त्यांच्यात कमालीचा साधेपणा होता. अतिशय शांत, संयमी तसेच इतरांच्या समस्येत सल्ला देऊन त्यांना सुयोग्य मार्ग दाखवणारे डॉ. शांताराम नाईक यांच्या आकस्मिक निधनामुळे समस्त कुटुंब, सहकारी अधिकारी व कर्मचारी वर्ग, मित्रपरिवार दुःखात बुडाले आहेत.

Related posts

ब,जे आणि ई प्रभागात अनधिकृतपणे लावलेल्या बॅनर्स पोस्टर्स वर निष्कासनाची धडक कारवाई

Bundeli Khabar

सोनी टीवी का ‘इंडियाज़ बेस्ट डांसर – सीजन 2’ खोजेगा ‘बेस्ट का नेक्स्ट अवतार’

Bundeli Khabar

कायदा व सुव्यवस्था संदर्भात पोलीस सहआयुक्तांच्या उपस्थितीमध्ये झोन ४ मधील नगरसेवकांची बैठक

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!