26.3 C
Madhya Pradesh
September 10, 2026
Bundeli Khabar
images 2 3
महाराष्ट्र

सूचक नाका येथे समाजसेवक मनोज वाघमारे यांच्यावर प्राणघातक हल्ला

Bundelikhabar

गांजा पिण्यास विरोध केल्याने सचिन गायकवाड या इसमाने केला हल्ला.

संदीप शेंडगे/महाराष्ट्र
कल्याण : सूचक नाका परिसरातील समाजसेवक मनोज वाघमारे यांच्यावर महात्मा फुले नगर येथील सचिन गायकवाड या गांजा पिण्याचे व्यसन असलेल्या युवकाने धारदार शस्त्राने वार करून जखमी केले आहे.
या हल्ल्यात मनोज वाघमारे हे थोडक्यात बचावले असून त्यांच्यावर पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत।


महात्मा फुले नगर सूचक नाका परिसरातील काही नशेडी युवक या ठिकाणी गांजा ओढत असून महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाचे नुकसान करीत असतात या परिसरातील नागरिकांना याचा मोठा त्रास होत असे ही बाब मनोज वाघमारे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी गांजा ओढत असलेल्या तरुणांना गांजा ओढू नका असे सांगितले. या गोष्टीचा राग आल्याने सचिन गायकवाड या इसमाने वाघमारे यांच्यावर जोरदार हल्ला केला तसेच वाघमारे यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार कोळसेवाडी पोलीस स्टेशन येथे मनोज वाघमारे यांनी दिली आहे. आरोपी सचिन गायकवाड याच्यावर भा दं वि. ३२३,५०४,५०६ नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे।


Bundelikhabar

Related posts

भाजपाचे प्रदीप जोशी प्रभाग क्रमांक 21 अ मधून मैदानात…

Bundeli Khabar

कमांडर मनीलाल शिंपी यांनी आपल्या समाजाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर केले- कमलाकर कापडणे

Bundeli Khabar

ठगी: लाखों का चूना लगाने वाला नटवरलाल गिरफ्तार

Bundeli Khabar
error: Content is protected !!