30.4 C
Madhya Pradesh
May 5, 2024
Bundeli Khabar
Home » कल्याण डोंबिवली महानगर पालीका अ प्रभाग क्षेञातील आदिवासी कातकरी वाडी वस्तीचे भयान वास्तव,देशस्वातंत्र्याचा 74 वर्षे उलटूनही आदिवासी समाजाची परिस्थिती जैसे थे
महाराष्ट्र

कल्याण डोंबिवली महानगर पालीका अ प्रभाग क्षेञातील आदिवासी कातकरी वाडी वस्तीचे भयान वास्तव,देशस्वातंत्र्याचा 74 वर्षे उलटूनही आदिवासी समाजाची परिस्थिती जैसे थे

संदीप शेंडगे/महाराष्ट्र
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या अ प्रभाग क्षेत्रातील हक्केच्या अंतरावर असलेल्या कातकरी वस्ती पाड्यांमध्ये देशाच्या स्वांतञ्याच्या ७४ वर्षा नंतर कोणत्याही प्रकारची नागरी सोयी सुविधा म.न.पालिकेने पोहचवलेली नाही या कामी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आधिकारी व कर्मचारी सपशेल अपयशी आणी कुचकामी ठरलेली आहेत. पालिका मोठ्या मोठ्या वल्गना करते.योजना घोषित करते स्वच्छ सुंदर नगरी ,ग्रोथ महानगर, शहर डिजीटल शहर आता कुठे आहे. हे आदिवासी पाडे महानगर पालीकेत आहेत की ग्रामपंचायत मध्ये हा संशोधनाचा भाग ठरत आहे. नुकताच देशाच्या स्वांतञ्याचां अमृत मोहत्सवी ७५ वर्षा मध्ये पदार्पन केले या अमृत मोहत्सवी वर्षा मध्ये भारतीय राज्य घटनेने दिलेले मुलभुत आधिकार नागरीकांना मिळालेले नाही. स्वांतञ्याची खरी किरणे आदिवासी गरीब कष्टकरी यांच्या झोपड्डी पर्यंत अजुन पोहचलेली नाही याचे उत्तम उदाहरण म्हणजे अ प्रभाग क्षेत्रात पहावयास मिळेल म.न.पा.आधिकारी व कर्मचारी व संघटनेचे पदाधिकारी यांनी अ प्रभाग क्षेञातील गाळेगाव, बल्याणी, कातकरी वस्ती पाडा येथील केलेल्या पाहाणी दौ-या मध्ये भयान वास्तव समोर आले आहे .देशाच्या स्वांतञ्याच्या किमान ७५ वर्षात यावाडी मध्ये भारतीय राज्य घटनेने दिलेले मुलभुत आधिकार पोहचले नाहीत हे भयाण वास्तव आहे. श्रमजीवी संघटना या वाडीच्या वस्तिच्या नागरी सुविधांसाठी संघर्ष आंदोलन करून आदिवासीं समाजाला न्याय हक्क मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जि.सरचिटणीस राजेश चन्ने यांनी सांगितले. या वाडीच्या पाहाणी दरम्यान संघटनेचे ता.अध्यक्ष विष्णु वाघे ता.कातकरी संघटक प्रमुख वासुदेव वाघे , ता.संघटक गिता फसाले, ता. उपाध्यक्ष गणेश भामरे, विभागीय सचिव लक्ष्मण वाघे, उषा वाघे, यांच्यासह क.डों.म.न.पा. प्रभाग क्षेञ आधिकारी राजेश सांवत मुख्य अरोग्य सेवक राजेश गवाणकर पाणी पुरवठा मयुर शिंदे यांच्यासह आधिकारी कर्मचारी यांची उपस्थीती होती।

गेंड्याची कातडी असलेल्या पालिका प्रशासनाला हे भयाण वास्तव पाहून कधी जाग येते आणि या आदिवासी समाजाला सोयी सुविधा कधी पुरविते याकडे आदिवासी समाजाचे लक्ष लागून आहे।

Related posts

पुराने कोविड सेंटर का ऑडिट कराया जाए: मनसे विधायक प्रमोद (राजू )पाटिल

Bundeli Khabar

प्रा. भालचंद्र नेमाडे यांना साहित्य अकादमीची फेलोशिप प्रदान

Bundeli Khabar

साईधाम फिल्पकार्ड लॉजिकस्टीक मध्ये स्थानिक तरुणांना रोजगारासाठी मज्जाव :शिवसेनेचा जाब विचारण्यासाठी पुढाकार

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!