31.8 C
Madhya Pradesh
July 16, 2026
Bundeli Khabar
IMG 20210810 WA0031
महाराष्ट्र

महावितरणच्या भांडूप परिमंडलातील ग्राहकांनी थकवले ४८० कोटी एक लाखहून अधिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

Bundelikhabar

प्रमोद कुमार/महाराष्ट्र

मुंबई : महावितरण ही आशिया खंडातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी असून नावाप्रमाणेच चांगली व अखंडित सेवा ग्राहकांना देणे महावितरणचे एक महत्वपूर्ण ध्येय आहे. परंतु, अचानक उद्भवलेल्या कोरोना महामारीमुळे जगातील आर्थिक चित्र बदलले आहे. याचा परिणाम महावितरणला देखील पडला आहे. महावितरण मधील अनेक ग्राहकांनी आपले कोरोना काळातील वीजबिल थकविले आहेत. वारंवार विनंती करून ही अनेक ग्राहक वीजबिल भरण्याकडे लक्ष देत नाहीत. महावितरणची आर्थिक परिस्तिथी खराब झाली असून मुख्य कार्यालयाने वीजबिल वसुलीसाठी सर्व परिमंडलांना निर्देश दिले आहेत. सक्तीची कारवाई म्हणून महावितरणने भांडूप परिमंडलातील एक लाख ११६ ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीपोटी खंडित केला आहे. मुख्य अभियंता श्री. सुरेश गणेशकर यांनी थकबाकी असलेल्या ग्राहकांना वीजबिल भरण्याचे आवाहन केले आहे।


भांडूप परिमंडलातील उच्चदाब ग्राहकांची थकबाकी ४०.६१ कोटी आहे.लघुदाब ग्राहकांतील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांची थकबाकी २३५.७ कोटी, सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांची थकबाकी ५.७६ कोटी इतर ग्राहकांची ८.८५ कोटी, स्ट्रीटलाईटची थकबाकी १८५.०८ कोटी आहे. उच्चदाब व लघुदाब ग्राहकांची थकबाकी ४८०.६४ कोटी एवढी आहे. भांडूप परिमंडलाने विविध माध्यमातून ग्राहकांना वीजबिल भरण्याचे आवाहन वारंवार केले आहे. महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर असून मुख्य कार्यालयाने वीजबिलाची थकबाकी वसूल करण्याचे निर्देश सर्व परिमंडलाना दिले. वीजखरेदी, वीज पारेषण, बँक कर्जाचे व्याज तसेच कर्मचाऱ्यांचा पगार, या सर्व बाबींसाठी महावितरणला पैसे मोजावे लागतात. जर ग्राहकांनी त्यांचे थकीत वीजबिल भरले नाहीत तर दैनंदिन खर्च भागविणे अत्यंत कठीण होणार आहे. म्हणून नाईलाजाने महावितरणला थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची वेळ आली आहे।


महावितरणच्या भांडूप परिमंडलातील थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची जोरदार मोहीम सुरु असून आत्तापर्यंत एक लाख ११६ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. भांडूप परिमंडलातील ठाणे मंडळात १८.११ कोटी थकबाकी असलेल्या २८२२५ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. पेण मंडळात १३३.७४ कोटी थकबाकीमुळे ३९८९० ग्राहकांचा तर वाशी मंडळात ४९.११ कोटी थकबाकीमुळे ३२००१ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे।


मुख्य अभियंता भांडूप परिमंडल श्री.सुरेश गणेशकर म्हणाले की, ज्याप्रमाणे आपण टीव्ही, मोबाईल रिचार्ज, व इतर सुविधेचा वापर करण्यासाठी पैसे भरतो, त्याचप्रमाणे वापरलेल्या विजेचे पैसे भरलेच पाहिजे. तसेच, ग्राहक वीजचोरी करून किंवा अनधिकृतपणे वीजवापर करतांना आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. महावितरण ग्राहकांच्या सोयीसाठी सध्या सुट्टीच्या दिवशीही सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवेत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, ग्राहक डीजीटल माध्यमाचा वापर करूनही घरबसल्या आपले भरू शकतात।


Bundelikhabar

Related posts

शिवसेना प्रणित न्यु हिंदुस्थान कामगार सेना, अर्जुनली युनिट च्या नाम फलकाचे अनावरण

Bundeli Khabar

स्वास्थ्य विभाग के पेपर लीक मामले में दो लोगो को पुलिस ने किया गिरफ्तार

Bundeli Khabar

अनोखा सौंदर्य प्रतियोगिता ‘एवरग्रीन ब्यूटी कॉन्टेस्ट’ की विजेता बनी दीप्ती जोशी

Bundeli Khabar
error: Content is protected !!