32.7 C
Madhya Pradesh
May 17, 2024
Bundeli Khabar
Home » मुख्यमंत्री उध्दव ठाकरे गिरणी कामगार प्रश्नावर अनुकूल! सचिन अहिर यांनी काल भेट घेतली वर्षावर
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे गिरणी कामगार प्रश्नावर अनुकूल! सचिन अहिर यांनी काल भेट घेतली वर्षावर

किशोर पाटील/महाराष्ट्र
पालघर : राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गिरणी कामगारांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्न सोडवणुकीला अनुकूलता दर्शनवली आहे.राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष माजीराज्यमंत्री,शिवसेना उपनेते सचिन अहिर यांनी शुक्रवारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन गिरणी कामगारांच्या तातडीच्या प्रश्नावर चर्चा केली.राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई त्यावेळी उपस्थित होते गिरणी कामगार हक्काच्या घरांचा प्रश्न समूळ सुटण्यास कालापव्यय होत आहे,तेव्हा या प्रश्नी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्वरित गिरणी कामगार कृती संघटना नेत्यांची म्हाडा आणि संबंधित अधिकाऱ्यां समवेत बैठक बोलवावी आणि हा रखडत चाललेला प्रश्न मार्गी लावावा,अशी आग्रहाची मागणी सचिनभाऊ अहिर,यांनी केली आहे.या प्रसंगी मुख्यमंत्र्यांना गिरणी कामगार कृती संघटनेचे सविस्तर निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे,घरे मिळण्याबाबत अनेक अडचणी असून त्यांची सोडवणूक होऊन,या कामाला गती मिळावी.फॉर्म भरलेल्या दीड लाख कामगारांना घरे मिळवी, अशी कामगार संघटनांची मागणी आहे.तेव्हा या प्रश्नी आपणच तोडगा काढून गिरणी कामगारांना दिलासा मिळवून द्याल,असा विश्वास रा.मि.म. संघाचे अध्यक्ष सचिनभाऊ अहिर,खजिनदार तसेच गिरणी कामगार कृती संघटनेचे प्रतिनिधी निवृत्ती देसाई यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी बोलताना व्यक्त केला आहे.मुंबईतसह महाराष्ट्रातील टाटा,इं.यु.मिल क्र.५,पोद्दार, दिग्वीजय,बार्शी आणि अचलपूर या सहा गिरण्या कोनोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊने २१ मार्च २०२० पासून बंद आहेत. त्या मुळे गेली दीड वर्षें या गिरण्यांतील कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले सुमारे दहा हजार लोक उपासमारीचे जीवन जगात आहेत.याप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवली आहे।
मुंबईतील खाजगी तसेच एनटिसी गिरण्यांच्या जुन्या आणि धोकादायक चाळींच्या
पुर्वसनाची
योजना कार्यन्वित करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा, अशीही मागणी करून मा.श्री. सचिनभाऊ अहिर यांनी म्हटले आहे,एनटीसीने आपल्या गिरणी चाळींच्या पुनर्वसनावर कोणतेही सकारात्मक पाऊल उचललेले नाही.तसेच पन्नास वर्षापेक्षा या जुन्या चाळींची दुरुस्ती झालेली नाही.तेव्हा या चाळींवर अपघात होऊन जिवीतहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तेव्हा या चाळींचे म्हाडाद्वारे पुनर्वसन व्हावे,अशी राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मागणी केली असून या प्रश्नी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संबंधितांची बैठक बोलावून गिरण्यांच्या चाळींचे पुर्वसन घडवून आणावे,अशी विनंती करण्यात आली आहे.तसेच सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी वरील सर्व जिव्हाळ्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री निश्चित तोडगा काढतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

Related posts

यूपीएल लि. और गुजरात टाइटंस ने सस्टेनेबिलिटी के लिए किया सहयोग

Bundeli Khabar

कल्याण पूर्वेत तरुणीवर अत्याचार, आरोपीला न्यायालयीन कोठडी

Bundeli Khabar

Rainbow Pride of India Won by Beyonce and Ansh Tiwari

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!