26.7 C
Madhya Pradesh
July 28, 2026
Bundeli Khabar
IMG 20210804 WA0039
महाराष्ट्र

चिपळूण पूरग्रस्तांच्या घराघरात पोहचून जिजाऊचं मदतकार्य.

Bundelikhabar

महाराष्ट्र / ब्यूरो

टिटवाळा : निसर्गाच्या प्रकोपणे कोकणातील अनेक भागात दिनांक २१ जुलै रोजी महापूर आला. या महापुराची तीव्रता एवढी भयानक होती की अनेक गावांमध्ये २० फुटाहुन अधिक पाणी भरले अनेक गावांतील जवळ जवळ सर्व घरे पाण्याखाली बुडाली. तसेच चिपळूण, महाड सारखी कोकणातील दोन मुख्य बाजारपेठा असलेली शहरे पाण्याखाली गेली त्यामध्ये व्यापारी वर्ग, स्थानिक नागरिकांचे खूप नुकसान झाले. तर महाड तालुक्यातील तलीये गावांवर डोंगर कोसळल्याने दुर्दैवी घटना घडली त्यामध्यें असंख्य समाजबाधवांचा प्राण गेला. कोकणावर आलेले हे संकट इतकं भयानक होत की अनेक पूरग्रस्त भागांमध्ये अनेक दिवस घरांमध्ये गाळ भरल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाल्याने अन्नधान्याचे नुकसान झाल्यानें उपासमारीची वेळ पूरग्रस्तांच्यावर आली तसेच अनेकांचे संसार पूर्णपणे उध्वस्त झाले असल्याने कोकण हे माझं कुटूंब समजणाऱ्या व कोकणावर आलेले संकट हे आपल्यावर आलेले संकट आहे आणि ते दूर करण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक श्री निलेश सांबरे यांनी चिपळूण वासीय जनतेच्या सेवेसाठी २० जणांची स्वयंसेवकांची टीम, ४ रुग्णवाहिका, ५ हजार अन्नधान्य किट, १० हजार ब्लॅंकेट, ५ हजार बिस्लेरी बॉटल, औषधे, य वस्तूचे वाटप जवळपास ७ दिवस पूरग्रस्त भागांतील घराघरात जाऊन केले त्यामध्ये बागवाडी, नलावडेवाडी, खादंट भोईवाडी, नवीन कोलकेवाडी, पेठमाप, खेर्डी, पवारआळी, विठ्ठलवाडी, मालेवाडी, शिवाजीनगर, कुंभारवाडी, मुरादपूर, कोंबर, गोवलकुड, ढवनवाडी, गोलकुड, भोईवाडी, कृष्णावाडी, पेढीविठ्ठलपेठ, सावंतचाळ, यादवचाळ, कदमवाडी, दाभोलकर चाळ, साईमंदिर, बाजारपेठ, गोवळकोट, जुवाड, मिरजोले,व आदी भागांमध्ये पूरग्रस्तांना मदत कार्य वाटप केले. चिपळूण च्या या पूरग्रस्ताच्या मदत कार्यात जिजाऊ संस्थेचे सचिव श्री केदार चव्हाण, मितेश घाडी, सज्जन जमदरे, गोपाळ पाटोळे, रोहित चक्रवर्ती, मधुकर पवार, उमेश माने, परेश शिंदे, अली अन्सारी, रुपेश एगडे, अदणाद शेख, सन्नी गुरव, यतीन गुरव, तेजस गुरव, सुदर्शन पाटील व आदी सहकारी उपस्थित होते तर चिपळूण मधील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचे या मदत कार्याच्या अभियानाला विशेष सहकार्य लाभले।


कोकण वासीय जनतेवर आलेले संकट हे फक्त कोकणातील जनतेवर आलेले संकट नसून कोकण हे जिजाऊचं कुटूंब आहे आणि हे संकट सोडवणे हे जिजाऊचं आद्य कर्तव्य आहे. कोकणातील पूरग्रस्तांच्या सोबत संपूर्ण जिजाऊ परिवार खंबीरपणे उभे असून सामाजिक , शैक्षणिक व आरोग्य शेत्रात शक्य होईल तेवढी मदत करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत राहू. – श्री निलेश सांबरे संस्थापक जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र


Bundelikhabar

Related posts

स्थानिकांच्या जमिनी लुटणारा देवदूत

Bundeli Khabar

मुसळधार पावसामुळे कौलारू घर जमीनदोस्त

Bundeli Khabar

भारत जगभरातील रुग्णांसाठी गुणवत्तापूर्ण उपचार व प्रत्यारोपण केंद्र

Bundeli Khabar
error: Content is protected !!