22.7 C
Madhya Pradesh
September 11, 2026
Bundeli Khabar
IMG 20210908 WA0028
महाराष्ट्र

मुसळधार पावसामुळे कौलारू घर जमीनदोस्त

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील खडकी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आमराई या गावात पहाटे ५.३० वाजता श्री.रामा नाऊ पडवळ यांचे घर मुसळधार पावसामुळे जमीनदोस्त झाले आहे.यामुळे त्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे.येथील स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी मा.श्री.प्रकाशजी तेलिवरे (सभापती समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद ठाणे) यांच्याशी संपर्क साधला असता सकाळी ९.०० वाजता प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी उपस्थित राहिले
त्याचप्रमाणे भिवंडी तालुका तहसीलदार श्री. अधिक पाटील, गटविकास अधिकारी श्री.घोरपडे तसेच तलाठी यांच्याशी संपर्क साधून सरकारी पंचनामे करण्यास सांगितले आहे।


सरकारी मदत उपलब्ध होईल तेव्हा होईल पण आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आपणास घर येत्या काही दिवसात बांधुन देऊ असे आश्वासन मा. श्री. प्रकाश तेलिवरे यांनी दिले आहे, त्याबद्दल श्री.रामा नाऊ पडवळ या दापंत्यांनी प्रकाश तेलिवरे यांचे मनापासून आभार व्यक्त केले।


याप्रसंगी मा.श्री.प्रकाशजी तेलिवरे , मा श्री. मायकल जाधव (शिवसेना शाखाप्रमुख) ,मा.श्री.नरेन गोराडकर शिवसेना शाखाप्रमुख (समाजसेवक) , श्री. बाळाराम कोंडारी ( स्थानिक शिवसेना कार्यकर्ता) श्री. कल्पेश पाटील, आमराई गावाचे पोलिस पाटील उपस्थित होते।


Bundelikhabar

Related posts

ब,जे आणि ई प्रभागात अनधिकृतपणे लावलेल्या बॅनर्स पोस्टर्स वर निष्कासनाची धडक कारवाई

Bundeli Khabar

चाइल्ड सैफ्टी के समर्थन में उतरीं हेमामालिनी

Bundeli Khabar

बढ़ती महंगाई के विरोध में युवसेना की साईकिल रैली

Bundeli Khabar
error: Content is protected !!