38 C
Madhya Pradesh
April 30, 2024
Bundeli Khabar
Home » कोकणच्या विकासासाठी एकत्र या – संजय यादवराव यांचे आवाहन
महाराष्ट्र

कोकणच्या विकासासाठी एकत्र या – संजय यादवराव यांचे आवाहन

▪️कोकण विभाग पत्रकार संघाचा वर्धापदिन व पुरस्कार वितरण संपन्न
▪️डॉ. दिलीप धानके यांच्या आठवणींनी सारेच झाले भावूक
▪️शौर्य पुरस्कार मयूर शेळकेना प्रदान करताना शिवरायांचा जयघोष
▪️सुप्रसिद्ध तारपा वादक भिकल्या धिंडा यांच्या तारपाच्या सुरांवर सर्वांनी धरला ताल

महाराष्ट्र / ब्यूरो
गेल्या दोन वर्षांपासून कोविडमुळे कोकणातील शेतकरी, बागायतदार, मच्छीमार व पर्यटन क्षेत्र अक्षरशः उध्वस्त झालं होत. त्यातच लागोपाठ दोन वेळा झालेली प्रलंयकरी वादळे नुकताच झालेला महापूर यामुळे कोकण दहा वर्षे मागे गेला आहे. कोकणाला पुन्हा उभारी देण्यासाठी शासनाने कोकणासाठी किमान 10 हजार कोटींची मदत देण्याची आवश्यकता असल्याची मागणी ग्लोबल कोकणचे संस्थापक संजय यादवराव यांनी केली आहे. मुरबाड तालुक्यातील श्री क्षेत्र संगम येथे बुधवारी (दि.28 जुलै) कोकण विभाग पत्रकार संघाच्या वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री यादवराव हे बोलत होते. तर सरकार कोणाचेही असो, मात्र कोकणाला सावत्र वागणूक दिली जात असून कोकणाच्या सर्वांगीण विकासाची सर्वांनी पक्षभेद, जाती धर्म भेद विसरून एकत्र यावे, असे आवाहनही संजय यादवराव यांनी केले आहे।

यह भी पढ़ें-कोपर रेलवे फ्लाईओवर जल्द ही हो सकता है शुरू ।

तर कोविड काळात जीवाची बाजी लावून पत्रकार काम करीत होते, त्यामुळे पत्रकार हे सुध्दा खरे कोविड योद्धे असल्याचे गौरवोद्गार अनुसूचित जमाती आढावा कमिटीचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) तथा शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांनी यावेळी बोलताना काढले. तर विधायक कामांसाठी कार्यरत असणाऱ्या पत्रकार व पत्रकार संघ यांच्या मदतीसाठी आम्ही सदैव तयार असून पत्रकारांच्या समस्या शासकीय स्तरावर मांडणार असल्याचे आश्वासन ही यावेळी आमदार दरोडा यांनी यावेळी बोलताना दिले.
तसेच कोकणातील प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी कोकण विभाग पत्रकार संघ कटिबध्द असून पत्रकारांच्या हितासाठी कार्यरत असतानाच कोकण विभाग पत्रकार संघाच्या कोकणातील सर्व जिल्हा व तालुका कमिट्या सामाजिक कार्यात यापुढेही कार्यरत राहतील, असे आश्वासन यावेळी बोलताना कोकण विभाग पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय हांडोरे पाटील यांनी यावेळी बोलताना दिले.
या कार्यक्रमासाठी एन के टी संस्थेचे अध्यक्ष नानजी भाई ठक्कर ठाणावाला, ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक तथा ठाणे महानगर पालिकेचे नगरसेवक बाबाजी पाटील, प्रबोधनकार कैलास महाराज निचिते, पंचायत समिती सदस्य सुभाष हरड, देशमुख – मराठा समाज अध्यक्ष काशिनाथ आबा झुंजाराव, कुणबी प्रतिष्ठानचे अध्यक्ष उदय पाटील, शिवव्याख्याते प्रशांत देशमुख, जेष्ठ पत्रकार महेश धानके, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भांगरथ, सामाजिक कार्यकर्त्या अपर्णाताई खाडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात संपादक उमेश भेरे यांच्या दैनिक अग्रलेखच्या कोकण विभाग पत्रकार संघ विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमात कोकण विभाग पत्रकार संघाच्या मुरबाड तालुका शाखेने ग्राम दत्तक योजने अंतर्गत सिंगापूर हे गाव दत्तक घेतल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोकण विभाग पत्रकार संघाचे कोकण विभाग अध्यक्ष जयेश शेलार पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन करूणा गगे व शिवाजी सातपुते यांनी केले.
या कार्यक्रमात कोकण विभागातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
यावेळी इतिहासकार व दिवंगत पुरोगामी विचारवंत डॉ.दिलीप धानके स्मृती पुरस्कार देताना सभागृहातील वातावरण डॉ.धानके यांच्या आठवणीने भावूक झाले होते.

कोकण विभाग पत्रकार संघाचा कोकण शौर्य पुरस्कार कर्जत येथील मयूर शेळके यांना प्रदान करण्यात आला. आपल्या जीवाची बाजी लावून भरधाव रेल्वे समोरून लहान मुलाचा जीव वाचवणाऱ्या मयूर शेळके हे पुरस्कार स्वीकारायला आल्यानंतर सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. तर मयूर शेळके यांच्या सोबत सेल्फी व फोटो घेण्यासाठी उपस्थितांनी एकच गर्दी केली.

कोकण विभाग पत्रकार संघाचा आदर्श लोककलावंत पुरस्कार पालघर जिल्ह्यातील वळवंडा (ता. जव्हार) येथील सुप्रसिद्ध तारपा वादक भिकल्या धिंडा यांना प्रदान करण्यात आला. यावेळी 84 वर्षीय भिकल्या धिंडा यांनी केलेल्या तारपा वादन सर्वांचे आकर्षण ठरले.

या कार्यक्रमात कोकण विभाग पत्रकार संघाच्यावतीने खालील प्रमाणे पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले…..
कोकण विभाग पत्रकार संघ वर्धापनदिन ‘पुरस्कारार्थी ‘ मान्यवर

1) कोकण भूषण पुरस्कार – बबनदादा हरणे, शहापूर
2)कोकण वैभव पुरस्कार – संजय यादवराव रत्नागिरी
3)कोकण शौर्य पुरस्कार- देवदूत मयूर शेळके, कर्जत
4)कोकण मित्र पुरस्कार – प्रशांत देशमुख, कर्जत
5)कोकण गौरव पुरस्कार डॉ- विनोदराव मोरे, रायगड
6)कोकण संदेश पुरस्कार – प्रविण सूर्यराव, शहापूर
7)कोकण समाज रत्न पुरस्कार. बाबाजी पाटील, ठाणे
8) डॉ दिलिप धानके स्मृती पुरस्कार – शिवश्री सुनील नाना अहिरे, विक्रमगड
9)आदर्श सरपंच चंदू कापडी, मुरबाड
10)क्रीडा रत्न विनोद पाटील कोनकर, भिवंडी
11)आदर्श लोकनेता रमेश हिंदुराव सर, शहापूर
12)आदर्श लोककला भिकल्या धिंडा, जव्हार
13) आदर्श समाज सेवा स्वप्नील एकनाथ भोईर, शहापूर
14) सामाजिक कार्य – प्रदिप पाटील, शहापूर
15)राष्ट्रसेवक पुरस्कार- इंद्र कुमार सिंह, मुंबई
16)उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार. श्रीकृष्ण खोत, सिंधुदुर्ग
17) आदर्श समाजसेवी पुरस्कार- श्रीपालजी जैन मुंबई
18)आदर्श अग्रलेखक पुरस्कार- उमेश भेरे, शहापृर
19)उत्कृष्ट समाजसेवा पुरस्कार सुरेश सोलंकी,, मुंबई
20) रुग्णमित्र पुरस्कार डॉ. प्रमोद पष्टे, शहापुर
21)वैद्यकीय सेवा डॉक्टर श्रीधर बनसोडे, मुरबाड
22)आदर्श समाजसेविका सुवर्णाताई ठाकरे, शहापूर
23)कला गौरव पुरस्कार सचिन पोतदार मुरबाड
24)उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार नंदकुमार आयरे, मुरबाड
25)उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार. संजय वालावलकर, सिंधुदुर्ग
26)उत्कृष्ट पत्रकारिता. पुरस्कार प्रसन्न गोंदावळे, सिंधुदुर्ग
27) उत्कृष्ठ पत्रकारीता पुरस्कार सचिन रेडकर सिंधुदुर्ग
28)विद्या रत्न पुरस्कार रवि काजळे सर- मुरबाड
29) सौ .दिपाली पिंगळे आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कार, शहापूर
30)सामाजिक कार्य पुरस्कार. मनोज कालिजकर, रायगड
31) उत्कृष्ठ वैद्यकीय सेवा पुरस्कार-डॉ .स्वप्नील शिरसाठ, शहापूर
32) उकृष्ट समाज सेवा पुरस्कार राजेंद्र भांगरे, भिवंडी
33) सामाजिक बांधिलकी शशांक ठाकरे, वाडा
35) सामाजिक बांधिलकी विशाल ठाकरे, वाडा
३5)आदर्श विधी रत्न पुरस्कार बाळाराम ज देशमुख, शहापूर
३6) रुग्ण सेवा पुरस्कार अरविंद देशमुख, वाडा
37) सौ.रोहिणी रोहिदास शेलार
आदर्श महिला नेतृत्व, वाडा
38) कोकण साहित्य रत्न
रविंद्र यशवंतराव (देशमुख), मुरबाड
39) कोकण नवरत्न पुरस्कार
हभप संतोष महाराज बिडकर, कल्याण

Related posts

शिवसेना शाखा,वळ च्या वतीने, गरीब गरजु महिलाना साड्या वाटप

Bundeli Khabar

ऑनलाइन पढ़ाई शॉर्ट फिल्म का आरे कॉलोनी में मुहूर्त संपन्न

Bundeli Khabar

गोदरेज मैमोरियल हॉस्पिटल ने जीनोमिक्‍स में रखा कदम

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!