31 C
Madhya Pradesh
May 20, 2024
Bundeli Khabar
Home » वांद्रे शासकीय वसाहतीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा
महाराष्ट्र

वांद्रे शासकीय वसाहतीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : वांद्रे (पूर्व) येथील शासकीय वसाहतीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मालकी हक्काच्या घराच्या मागणीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान भवनात आढावा घेतला.

विधान भवनातील समिती कक्षात झालेल्या या आढावा बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार ॲड. अनिल परब, आमदार झिशान सिद्दीकी, माजी आमदार किरण पावसकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, अपर मुख्य सचिव नितीन करीर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास आदी वरिष्ठ अधिकारी आणि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

वसाहतीतील रहिवाशांना मोफत घरे न देता इमारत बांधकाम खर्च आकारण्यात यावा. खचलेल्या व अति धोकादायक इमारतींचा पुनर्विकास प्राधान्याने व्हावा. १५ एकर जागा राखीव ठेवावी, अशा विविध मागण्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

Related posts

बदलापूर,ठाणे,महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार लक्ष्मण राजे यांना प्रदान

Bundeli Khabar

ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेसची डिजीटल सदस्य नोंदणी आढावा बैठक संपन्न

Bundeli Khabar

महाविकास अघाड़ी ने लखीमपुर की घटना को लेकर विरोध प्रदर्शन

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!