39.2 C
Madhya Pradesh
May 17, 2024
Bundeli Khabar
Home » होळीनिमित्त मध्य रेल्वेवर १० अधिक विशेष गाड्या
महाराष्ट्र

होळीनिमित्त मध्य रेल्वेवर १० अधिक विशेष गाड्या

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : होळी सणासाठी मध्य रेल्वे मार्गावर ९० विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. सणादरम्यान प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर आणि पनवेल- छपरा दरम्यान आणखी १० विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मुंबई- गोरखपूर एसी स्पेशल गाडीच्या ४ सेवा धावणार आहेत. गाडी क्रमांक ०२५९८ एसी होळी विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ५ मार्च आणि १२ मार्च रोजी १२.४५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी रात्री १२.३० वाजता गोरखपूरला पोहोचेल. तर गाडी क्रमांक ०२५९७ गाडी गोरखपूरहून १३ मार्च आणि १० मार्च रोजी रात्री ८.५५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनसला ७.२५ वाजता पोहोचेल. यासोबत पनवेल-छपरा स्पेशल गाडीच्या ६ सेवा धावणार आहेत. या गाड्यांचे आरक्षण विशेष शुल्कावर बुकिंग १ मार्च रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर खुले होणार आहे.

Related posts

भाजपा विधायक सुनील राणे ने जारी किया विकास कार्यों की द्विवार्षिक लेखा जोखा    

Bundeli Khabar

लाडक्या बैलाचा मृत्यू …माणसाप्रणाणे काढली अंत्ययात्रा

Bundeli Khabar

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!