28.5 C
Madhya Pradesh
September 11, 2026
Bundeli Khabar
IMG 20221209 WA0003
महाराष्ट्र

अखिल भारतीय कीर्तन संस्थेचे अध्यक्ष सुरेश उपाध्ये यांचे निधन

Bundelikhabar

9 / 100 SEO Score

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ८२ वर्षीय जुनी सुप्रसिद्ध अखिल भारतीय कीर्तन संस्था दादर -मुंबई या नामांकीत संस्थेचे अध्यक्षपद गेली अनेक वर्षे समर्थपणे सांभाळणारे सुरेश उपाध्ये यांचे शुश्रुषा रुग्णालयात गुरुवारी सकाळी निधन झालं.

शिक्षकी नोकरीतून निवृत्त झाल्यावर आपल्या जीवनाचा उर्वरीत काळ त्यांनी कीर्तन संस्थेला दिला.कीर्तनसंस्थेचा आर्थिक तसेच सर्व प्रकारचा कारभार त्यांनी निस्पृहपणे चोखपणे सांभाळला. उत्तम वक्तृत्व , शिस्तप्रिय आणि मोत्यासारखे सुंदर अक्षर , सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाच लयीत , एका ओळीत सुबक पणे सर लिहीत. आजपर्यंत अनेक कीर्तनकार घडवण्यात तसेच कीर्तन संस्थेचे वर्षभर विविध उपक्रम त्यांनी राबवले. आजारपणात सुद्धा कीर्तन संस्थेचाच विचार त्यांच्या मनात होता.
संस्थेच्या आणि त्यांच्याशी निगडित संस्थाच्या वतीने २० डिसेंबर रोजी संस्थेच्या सभागृहात द ल वैद्य मार्ग दादर येथे शोकसभेचे आयोजन केले असल्याचं प्रमुख विश्वस्त रवींद्र आवटी यांनी सांगितले


Bundelikhabar

Related posts

सुनील म्हसकर ठरले मानवसेवा विकास फाऊंडेशनच्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी

Bundeli Khabar

अखिल भारतीय अग्निशखा मंच का ‘जश्न ए आज़ादी’ कार्यक्रम सम्पन्न

Bundeli Khabar

रेड एफएम की ओर से सुपरहिट
मराठी फिल्म फेस्टिवल के तीसरे सीज़न की घोषणा

Bundeli Khabar
error: Content is protected !!