21.9 C
Madhya Pradesh
January 29, 2026
Bundeli Khabar
Home » मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि गझल मंथन साहित्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १५ जानेवारी रोजी मुंबईत होणार ‘मराठी गझल लेखन कार्यशाळा’
महाराष्ट्र

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि गझल मंथन साहित्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १५ जानेवारी रोजी मुंबईत होणार ‘मराठी गझल लेखन कार्यशाळा’

Bundelikhabar

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : रविवार, दिनांक १५ जानेवारी २०२३ रोजी शतकोत्तर रौप्य महोत्सवी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि गझल मंथन साहित्य संस्था आणि यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय नि:शुल्क मराठी गझल लेखन कार्यशाळा तसेच मराठी गझल मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या एकदिवसीय कार्यक्रमात पहिल्या सत्रात होणाऱ्या गझल लेखन कार्यशाळेत सर्वश्री ख्यातनाम गझलकार डॉ. कैलास गायकवाड, सुप्रसिद्ध गझलकार प्रमोद खराडे आणि सुप्रसिद्ध गझलकार शांताराम (शाम) खामकर आदि प्रथितयश मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. दादर पूर्व येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात सदर कार्यशाळा घेण्यात येणार असून यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीला सहभाग प्रमाणपत्र तसेच प्राविण्य प्राप्त करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. यानंतर दुपारच्या दुसऱ्या सत्रात मान्यवर गझलकारांचा मुशायरा होणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर नोंदणी करण्यात येणार असल्यामुळे गझल लेखन शिकण्याची इच्छा असणाऱ्यांनी ९८६९३३६३३७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर व्हॉटस्अॅपद्वारे नाव नोंदणी करावी, असे आवाहन रवींद्र गावडे, प्रमुख कार्यवाह, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि मनोज सूर्यकांत वराडे, अध्यक्ष, मुंबई जिल्हा, गझल मंथन साहित्य संस्था यांनी केले आहे .


Bundelikhabar

Related posts

यंदाही ठाणे महापालिकेची फिरती विसर्जन व्यवस्था,महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांची माहिती

Bundeli Khabar

शरद पवार इनस्पायर फेलोशीपचे निकाल जाहीर; कृषी क्षेत्रासाठी ८० तर साहित्यासाठी १० गुणवंतांची निवड

Bundeli Khabar

मुंबईतलं नवं पर्यटन स्थळ शिवडी परिसरात

Bundeli Khabar
error: Content is protected !!