22.4 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » डॉ.श्री. दिनेश भाई ठक्कर यांच्या वतीने २७५ दिवस गोरगरीब,गरजु,अनाथांना मोफत जेवण अखंडीत सेवा
महाराष्ट्र

डॉ.श्री. दिनेश भाई ठक्कर यांच्या वतीने २७५ दिवस गोरगरीब,गरजु,अनाथांना मोफत जेवण अखंडीत सेवा

किशोर पाटील
कल्याण : कल्याण शहरातील श्री स्वामीनारायण ट्रस्ट कल्याण चे अध्यक्ष डॉ.श्री. दिनेश बळवंतराय ठक्कर यांच्या सौजन्याने त्यांच्या सर्व पदाधिकारी यांनी सातत्याने सुरू ठेवलेली सामाजिक बांधिलकी जपत कल्याण शहरातील विविध विभागात जाऊन तेथील अनाथ,गोरगरीब,गरजु , वीट भट्टी वरील मुले मजूर अशा मुलांना व मजुरांना १४ जानेवारी २०२२ मकर संक्रातीच्या पूर्वसंध्येला पुलाव भात, भाजी, व गुलाबजाम, जिलेबी, कांदा पोहे, पुरी भाजी, चे २७५ दिवस मोफत जेवण वाटप अखंडीत सेवा कम्युनिटी किचन च्या माध्यमातून सुरू ठेवली आहे.व आपल्या सामाजिक कार्यात नेहमीच ते स्व:ता अग्रेसर असतात.

या त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक संस्थांनी त्यांच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा गौरव केला आहे. त्याचप्रमाणे ८ नोव्हेंबर २०२१ रोजी राजभवन मुंबई येथे महाराष्ट्राचे राज्यपाल सन्माननीय भगतसिंग कोशारी यांच्या शुभहस्ते त्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.

Related posts

भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पाटील यांची स्वराज्य तोरण कार्यालयाला सदिच्छा भेट

Bundeli Khabar

विश्वनाथ वाबळे स्मृती समाजभूषण पुरस्कार

Bundeli Khabar

राम सेतु समुद्रात बुडाला

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!