23.3 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » २० ते २५ डिसेंबर दरम्यान “द्रोणागिरी” २२वा युवा महोत्सव रंगणार
महाराष्ट्र

२० ते २५ डिसेंबर दरम्यान “द्रोणागिरी” २२वा युवा महोत्सव रंगणार

रायगड (गुरुदत्त वाकदेकर) : द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन यांच्यातर्फे २२वा युवा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यात मैदानी स्पर्धांसोबतच साहित्यालाही विशेष स्थान देण्यात आले आहे. यंदाही रायगड जिल्हास्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर काव्य स्पर्धा बुधवार दिनांक २१ डिसेंबर, २०२२ रोजी दुपारी ठीक ३:३० वाजता बोकडवीरा गाव, एन्. एम्. एस्. ई. झेड. मैदान, पेट्रोल पंपाजवळ, ता. उरण, जि. रायगड येथे होणार आहे, अशी माहिती द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत, सचिव दिलीप तांडेल, स्पर्धा प्रमुख/सूत्रसंचालक अरुण द. म्हात्रे, संयोजक/निवेदक संजय होळकर, भ. पो. म्हात्रे यांनी कळवली आहे.

*काव्य स्पर्धेच्या नियम व अटी:-*
रायगड जिल्ह्यातील कवींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी १८ वर्षांवरील ५० सारस्वतांसाठी सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा नि:शुल्क आहे. काव्यस्पर्धेसाठी विषयाचे बंधन नाही. कविता मराठी भाषेतच, स्वरचित आणि सकारात्मक असावी. कोणत्याही प्रकारचे अश्लील/अर्वाच्य शब्द वापरू नयेत. सामाजिक/ राजकीय तेढ निर्माण करणार्‍या तसेच कुणाचेही मन दुखावणार्‍या रचना नकोत. कविता फक्त तीन मिनिटांत पाहून/वाचून/गाऊन सादर करता येईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक राहील. कार्यक्रमात फेरबदल करण्याचे अधिकार आयोजकांनी अबाधित ठेवले आहेत. सूचना-नियम पाळावेत. सर्व सहभागी स्पर्धकांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्प देऊन सन्मान करण्यात येईल. स्पर्धेचा निकाल तसेच बक्षिसे आणि प्रमाणपत्र स्पर्धेच्या ठिकाणी लगेचच देण्यात येतील. दिनांक १९ डिसेंबर, २०२२ पर्यंत नाव नोंदणी ९८२०४५२४२७ किंवा ९००४७६६१५८ ह्यापैकी एकाच व्हाॅट्सअॅप क्रमांकांवर करावी. आपली नावनोंदणी झाली की नाही हे आपल्याला कळवले जाईल. कृपया दूरध्वनी करू नये. स्पर्धकांनी स्वखर्चाने येणे-जाणे करायचे आहे. सर्व सहभागींसाठी चहापाणी तसेच गाड्या पार्किंगची विनामूल्य सोय केलेली आहे.

Related posts

भाजपातर्फे श्रमिकांना ई-श्रम कार्ड

Bundeli Khabar

बापगांव देवरुंग येथील १४ जर्षि गायींचा मृत्यू

Bundeli Khabar

पुणे लॉकडाउन गाइडलाइन पर राजेश टोपे और सीताराम कुंटे के बीच बैठक

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!