20 C
Madhya Pradesh
September 27, 2026
Bundeli Khabar
IMG 20221117 WA0003
महाराष्ट्र

चरित्र अभिनेते डॉ. गिरीश कर्नाड यांच्या स्मरणार्थ नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा

Bundelikhabar

9 / 100 SEO Score

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : प्रसिध्द बहुभाषिक चरित्र अभिनेते डॉ. गिरीश कर्नाड यांच्या स्मरणार्थ रंगविष्कार व मैत्री संस्थेच्या संयुक्त विद्यमाने डिसेंबर व जानेवारी महिन्याच्या कालावधीमध्ये नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा प्रत्येक शनिवार व रविवारी सायं. ६.०० ते ८.०० या वेळेत ग्रँट रोड, मुंबई या ठिकाणी होणार आहे. ही कार्यशाळा १६ वर्षांवरील स्त्री पुरुषांसाठी असून प्रशिक्षणार्थींची निवड मुलाखती द्वारे करण्यात येईल.

नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाचे संचालक, नाटककार प्रा. वामन केंद्रे यांचे शिष्य नाट्य दिग्दर्शक बजरंग सोनवणे, निवेदक व गायक सुरज भोईर यांच्यासह नाट्य व चित्रपट सृष्टीतील विविध मान्यवरांचं मार्गदर्शन या प्रशिक्षणात लाभणार आहे. सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात येईल.

या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या इच्छुकांनी बजरंग सोनवणे 9082239593 व सुरज भोईर 9969686014 यांच्याशी संपर्क साधावा. वरील क्रमांकावर प्रवेश अर्ज ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध असतील. इच्छुकांनी वरील क्रमांकावर संपर्क साधावा असे अावाहन संयोजकांतर्फे करण्यात येत आहे. मुल्य शिक्षण, व्यक्तिमत्व विकास, नाट्य परिचय, अभिनय प्रकार, निवेदन व गीत संगीत इत्यादी विषयांवर कार्यशाळेत मार्गदशन लाभणार आहे. प्रवेश मर्यादित राहिल.

नाट्य कार्यशाळेच्या उद्घाटनासाठी प्रसिध्द नाट्य दिग्दर्शक प्रेमानंद गजवी, शाहिर संभाजी भगत, प्रसिध्द शाहिर व गायक नंदेश उमप, मीस महाराष्ट्र स्नेहल भोपळे, अभिनेत्री संजिवनी जाधव, चित्रपट दिग्दर्शक संचित यादव, अभिनेते जयवंत भालेकर, नृत्य दिग्दर्शक सागर नटराज व अभिनेत्री पोर्णिमा वाव्हळ हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


Bundelikhabar

Related posts

आ. बालाजी किणीकर व ज्ञानेश्वर म्हात्रे यांची शैक्षणिक समस्या व शालेय अनुदान विषयावर अधिकाऱ्यांशी विशेष चर्चा

Bundeli Khabar

शंभर टक्के लसीकरण केल्याबद्दल नारिवली ग्रामपंचायतीचा

Bundeli Khabar

मालाड में परमार्थ का रुद्राभिषेक

Bundeli Khabar
error: Content is protected !!