27.9 C
Madhya Pradesh
October 5, 2024
Bundeli Khabar
Home » भारत फाळणी दुष्परिणामविषयी उद्या दादरमध्ये व्याख्यान
महाराष्ट्र

भारत फाळणी दुष्परिणामविषयी उद्या दादरमध्ये व्याख्यान

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जनमानसात प्रखर राष्ट्रनिष्ठा निर्माण व्हावी, यासाठी तसेच त्यांच्या हिंदुत्व संघटन कार्याचे परीक्षण व्हावे, परिचय व्हावा, यासाठी प्रखर राष्ट्रनिष्ठ पंडित नथुराम गोडसे यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने ‘भारताच्या फाळणीचे परिणाम’ या विषयावर वक्ते दुर्गेश परुळकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम १५ नोव्हेंबर २०२२ या दिवशी सायंकाळी सहा वाजता पाटील मारुती मंदिर सभागृह, वीर कोतवाल उद्यानाजवळ, दादर (पश्चिम) येथे होईल.

पंडित नथुराम गोडसे, हिंदुत्व विचारसरणीशी जोडले गेले आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वात भिनलेली प्रखर राष्ट्रनिष्ठा बहुजनांमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे. त्यांच्या विधायक देश हितकारक कार्याकडे पाहण्याची आवश्यकता आजही प्रकर्षाने जाणवते, त्यामुळेच या कार्यक्रमास अधिकाधिक राष्ट्रभक्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदुमहासभेचे कार्यवाह दिलीप मेहेंदळे यांनी केले आहे.

Related posts

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गो-हे यांची महानगरपालिकेस भेट

Bundeli Khabar

भाजपा शिवडी विधानसभेतर्फे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन

Bundeli Khabar

हुनर बिझनेस नेटवर्क तर्फे समाजातील मान्यवरांचा सन्मान सोहळा

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!