26.8 C
Madhya Pradesh
September 28, 2026
Bundeli Khabar
IMG 20221115 WA0017
महाराष्ट्र

बृहन्मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी गोवा ट्रायलॉथॉन यशस्वी केली

Bundelikhabar

6 / 100 SEO Score

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : बृहन्मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी गोवा येथे रविवारी झालेल्या हाफ ट्रायलोथॉन स्पर्धेत “गोवा आयन मॅन ७०.३ हा पुरस्कार मिळवला. यात १.९ किमी पोहणे, ९० किमी सायकलिंग आणि २१ किमी धावणे याचा समावेश असून हे सर्व एकत्रितपणे त्यांनी सात तास एकोणतीस मिनिटात पार केले. मोटे हे महापालिकेतील उत्साही आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून परिचित आहेत. रोजचा व्यायाम, सायकलिंग आणि पोहणे तसेच धावणे हे प्रत्येकाने केल्यास आपले आरोग्य उत्तम राखता येईल असे ते सर्व सहकाऱ्यांना सांगत असतात. “डिटरमिनेशन, डेडिकेशन, डिसीप्लिन” ही त्रिसूत्री ते देतात. २०१७ साली “टाटा ड्रीम रन” मध्ये सहभाग, २०१८ मध्ये टाटा हाफ मॅरेथॉन, २०१९ टाटा फुल मॅरेथॉन (आपला ४२ वा वाढदिवस हा ४२ किमी धावण्यात सहभाग घेऊन त्यांनी साजरा केला), २०२० टाटा फुल मॅरेथॉन केली. आता गोवा ट्रायलोथॉन पार करून त्यांनी नवा विक्रम जोडलेला आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


Bundelikhabar

Related posts

समाज के विशिष्ट लोग नेल्सन मंडेला नोबल पीस अवार्ड एकेडमी द्वारा डॉक्टरेट की उपाधि से सम्मानित

Bundeli Khabar

पुलिस आयुक्त द्वारा आयोजित किया गया दरबार

Bundeli Khabar

कवियत्री व साहित्यकार रजनी साहू को मिला राज्य साहित्य अकादमी द्वारा संत नामदेव पुरस्कार

Bundeli Khabar
error: Content is protected !!