28.7 C
Madhya Pradesh
October 15, 2026
Bundeli Khabar
IMG 20221107 WA0003
खेल

पाकिस्तानचा बांगलादेशवर ५ गडी राखून विजय

Bundelikhabar

9 / 100 SEO Score

*उपांत्य फेरीत धडक*

मुबई (गुरुदत्त वाकदेकर) : टी२० विश्वचषकाच्या गट २ च्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशवर ५ गडी राखून विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. शाहीन शाह आफ्रिदीने कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट (४/२२) गोलंदाजी केली. अॅडलेडमध्ये विजयासाठी १२८ धावांचे माफक लक्ष्य पाकिस्तानने ११ चेंडू राखून गाठले.

फलंदाजी करताना बांगलादेशचा सलामीवीर नजमुल हुसेन शांतोने ५४ धावा केल्या, तर अफिफ हुसेन २४ धावांवर नाबाद राहिला. नंतर पाकिस्तानने १८.१ षटकात ५ बाद १२८ धावा केल्या. मोहम्मद रिझवानने ३२ चेंडूत ३२ धावा केल्या, तर मोहम्मद हरिसने १८ चेंडूंत ३१ धावा केल्या. बांगलादेशकडून नसुम अहमद (१/१४) सर्वोत्तम गोलंदाज ठरला. शाहीन शाह आफ्रिदीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.


Bundelikhabar

Related posts

राजस्थानचा रॉयल विजय

Bundeli Khabar

अटीतटीच्या सामन्यात भराताचा निसटता विजय

Bundeli Khabar

इंग्लंडचा न्यूझीलंडवर २० धावांनी विजय

Bundeli Khabar
error: Content is protected !!