39.3 C
Madhya Pradesh
May 18, 2024
Bundeli Khabar
Home » न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला ८९ धावांनी हरवले
महाराष्ट्र

न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला ८९ धावांनी हरवले

मुबई (गुरुदत्त वाकदेकर) : टी२० विश्वचषकाच्या मुख्य स्पर्धेला आज सुरूवात झाली. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तर न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा ८९ धावांनी पराभव करून ऑस्ट्रेलियन भूमीवर २०११ नंतर कोणत्याही स्वरूपातील पहिला विजय नोंदवला. टीम साउथी (३/६) याने ऑसींच्या पडझडीला सुरुवात केली. मिचेल सँटनर (३/३१) तर ट्रेंट बोल्टने (२/२४) शेपटीची काळजी घेतली. तत्पूर्वी, न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना डेव्हॉन कॉनवे (९२*) आणि फिन ऍलन (४२) यांच्या सहाय्याने २००/३ पर्यंत मजल मारली. ऍलन आणि कॉनवे यांच्यातील सलामीची भागीदारी ५६ धावांची होती आणि ती केवळ २५ चेंडूत झाली. फिनने १६ चेंडूत ४२ धावा केल्या. त्यानंतर कॉनवेने कर्णधार केन विल्यमसनसह (२३) दुसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. जेम्स नीशमच्या १३ चेंडूंत २६ धावांच्या सहाय्याने कॉनवे सोबत चौथ्या विकेटसाठी २४ चेंडूत नाबाद ४८ धावांची भागीदारी केली. डेव्हॉन कॉनवे (९२*) ला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

Related posts

‘आजादी का अमृत महोत्सव’ को चिह्नित करने के लिए पूरे भारत के 75 बाइकर्स लेंगे हिस्सा

Bundeli Khabar

हत्या के तीन आरोपी पुलिस गिरफ्त में

Bundeli Khabar

हिवाळी अधिवेशन कालावधीत मुंबई स्थित मुख्य सचिवांचे कार्यालय नागपूर शिबीर कार्यालयात

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!