40.1 C
Madhya Pradesh
May 18, 2024
Bundeli Khabar
Home » हिवाळी अधिवेशन कालावधीत मुंबई स्थित मुख्य सचिवांचे कार्यालय नागपूर शिबीर कार्यालयात
महाराष्ट्र

हिवाळी अधिवेशन कालावधीत मुंबई स्थित मुख्य सचिवांचे कार्यालय नागपूर शिबीर कार्यालयात

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : विधिमंडळाचे सन २०२२ चे तिसरे (हिवाळी) अधिवेशन नागपूर येथे १९ डिसेंबर पासून सुरू होणार आहे. या अधिवेशन कालावधीकरीता १५ डिसेंबर पासून मुंबई स्थित मुख्य सचिवांचे कार्यालय नागपूर येथील शिबीर कार्यालयात सुरू करण्यात येत आहे.

सर्व मंत्रालयीन विभाग, मुंबई यांचे मुख्य सचिवांच्या कार्यालयात स्वीकारण्यात येणारे धारिका, टपाल, निवेदन १४ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी तीन वाजल्यापासून स्वीकारण्याचे बंद करण्यात येईल. मुख्य सचिव कार्यालयाला सादर करावयाची कागदपत्रे, धारीका, टपाल इत्यादी १५ डिसेंबर पासून ते अधिवेशन संस्थगित होईपर्यंतच्या कालावधीमध्ये मुख्य सचिवांचे शिबीर कार्यालय, हैद्राबाद हाऊस, नागपूर येथील कार्यालयात स्वीकारण्यात येतील.

Related posts

भिवंडीत रेती माफिया विरुद्ध महसूल विभागाची धडक कारवाई रुपये १४ लाखाचा मुद्देमाल जप्त

Bundeli Khabar

डोंबिवली एमआईडीसी के डाकघर, पासपोर्ट सेवा केंद्र शुरू

Bundeli Khabar

अत्यावश्यक सेवांमध्ये राज्यातील पत्रकारांचा समावेश व लोकल प्रवास अनुमति साठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!