22.4 C
Madhya Pradesh
August 31, 2026
Bundeli Khabar
IMG 20221012 WA0014
महाराष्ट्र

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

Bundelikhabar

9 / 100 SEO Score

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष आ. नानाभाऊ पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षप्रमुख व मा. मुख्यमंत्री उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांची मातोश्री बंगल्यावर भेट घेऊन राज्यातील राजकीय घडामोडी विषयी सविस्तर व मनमोकळेपणाने चर्चा केली. त्यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष व आमदार भाई जगताप, मा. मंत्री अमित देशमुख, महाराष्ट्र प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे उपस्थित होते.
काँग्रेस पार्टी अंधेरी पोटनिवडणुकीत पूर्ण ताकदीने मैदानात उतरून शिवसेना उमेदवार व स्वर्गीय आमदार रमेश लटके यांच्या पत्नी श्रीमती ऋतुजा रमेश लटके यांना प्रचंड बहुमताने निवडून आणेल व संपूर्ण महाविकास आघाडी यात सामील होईल असा विश्वास दिला.
यानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष, आमदार भाई जगताप, शिवसेना नेते, मा. मंत्री अनिल परब व राष्ट्रवादीच्या नेत्या राखीताई जाधव यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली.


Bundelikhabar

Related posts

सैनी इंडिया का रिकॉर्ड प्रदर्शन

Bundeli Khabar

संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियाना अंतर्गत फळे व भाजीपाला विक्री केंद्राचे उद्घाटन

Bundeli Khabar

काँग्रेसच्या ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पदी दयानंद चोरघे यांची नियुक्ती

Bundeli Khabar
error: Content is protected !!