22.8 C
Madhya Pradesh
September 11, 2026
Bundeli Khabar
IMG 20221004 WA0021
महाराष्ट्र

कार्यभार दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी स्वीकारला

Bundelikhabar

9 / 100 SEO Score

मुंबई (प्रतिनिधी) : उद्योग विकास आयुक्त तसेच मैत्री कक्षाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी आज स्वीकारला.

उद्योग संचालनालयाच्या मुंबई कार्यालयात डॉ. हर्षदीप कांबळे यांच्याकडून श्री. कुशवाह यांनी कार्यभार स्वीकारला.

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या प्राधान्य असलेल्या उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी उद्योग संचालनालय कार्यरत राहील, असे श्री. कुशवाह यांनी यावेळी सांगितले.

श्री. कुशवाह २००६ च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. याआधी जिल्हाधिकारी, सांगली, नाशिक, मुंबई उपनगर, मुख्य कार्यकारी अधिकारी – म्हाडा, आयुक्त, कौशल्य विभाग, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी अशा विविध पदांवर कार्यरत राहिले असून एक अभ्यासू, कर्तव्यदक्ष, नाविन्यपूर्ण विचारसरणी व प्रशासनाचा गाढा अभ्यासक म्हणून श्री. कुशवाह यांची ओळख आहे.


Bundelikhabar

Related posts

जडेजाच्या १७५ नाबाद खेळीनंतर श्रीलंका १०८/४

Bundeli Khabar

सांसद डा. श्रीकांत शिंदे की प्रयास से आगरी-कोली एवं वारकरी समाज की भवन के लिए 15 करोड़ रुपए की निधी मंजूर

Bundeli Khabar

पालघर जिल्हा माहिती कार्यालयाच्या, नवीन जागेचे काम प्रगतीत

Bundeli Khabar
error: Content is protected !!