31.8 C
Madhya Pradesh
May 15, 2024
Bundeli Khabar
Home » जिल्ह्यात ऑक्टोबर पर्यंत ३१ बोगस डॉक्टरांवर कारवाई
महाराष्ट्र

जिल्ह्यात ऑक्टोबर पर्यंत ३१ बोगस डॉक्टरांवर कारवाई

जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर शोध पुनर्विलोकन समितीच्या बैठकीत आढावा

किशोर पाटील/महाराष्ट्र
ठाणे : जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर शोध पुनर्विलोकन समितीची आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी तालुका समितीने बोगस डॉक्टरां विरुध्द केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागात दवाखाना सुरु करण्यासाठी ग्रामपंचायत किंवा नगरपंचायतीने ना-हरकत प्रमाणपत्र देण्यापूर्वी दवाखाना सुरु करणाऱ्या वैद्यकीय व्यवसायिकाचे प्रमाणपत्र तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तपासणीसाठी पाठवावे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे यांनी सांगितले.

यावेळी अंबरनाथ, भिवंडी, शहापूर, कल्याण, मुरबाड या तालुक्यातील बोगस डॉक्टरांसंबंधी करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला. बोगस डॉक्टरांवर कारवाई करताना पोलीस विभागाने तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक ते संरक्षण देण्याची सूचना डॉ.रेंघे यांनी यावेळी केली. ठाणे जिल्ह्यातील आता पर्यंत अंबरनाथ, भिवंडी, शहापूर, कल्याण, मुरबाड या पाच तालुक्यांमध्ये ऑक्टोंबर अखेर पर्यंत ३७ बोगस डॉक्टर आढळून आले असून त्यातील ३१ बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील ३१ प्रकरणे ही न्याय प्रविष्ठ असून ३० बोगस डॉक्टरांनी व्यवसाय बंद केल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सध्या तालुक्यात एकही बोगस डॉक्टर कार्यान्वित नसल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

बोगस डॉक्टरांना व्यवसाय सुरु करण्यापासून रोखण्यासाठी ग्रामीण भागात दवाखाना सुरु करण्याची परवानगी देताना ग्रामपंचायत अथवा नगरपंचायत यांनी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यापूर्वी संबंधित डॉक्टरची शैक्षणिक अर्हता आणि अन्य कागदपत्रे तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तपासणीसाठी पाठवावे. अशा स्वरुपाचे पत्र संबंधित यंत्रणांना देण्यात येईल असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रेंघे यांनी सांगितले. बैठकीस अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोषी शिंदे, अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त श्री.खापेकर आणि तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

Related posts

डॉ. शिरोडकर हायस्कूलच्या १९८८ सालातील दुपार अधिवेशनच्या माजी विद्यार्थ्याँनी बजावले आपले कर्तव्य कोल्हापूर मधिल पूरग्रस्तांना दिला मदतीचा दिलासा

Bundeli Khabar

पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज आपण ही काम करू शकतो – सपना भोईर

Bundeli Khabar

कविवर्य नारायण सुर्वे स्मृत्यर्थ काव्यवाचनाने रंगला शताब्दी सोहळा

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!