21.3 C
Madhya Pradesh
October 27, 2026
Bundeli Khabar
IMG 20220918 WA0012
महाराष्ट्र

जागतिक स्वच्छता दिनानिमित्त ‘फ़ॉर फ़्यूचर इंडिया’ संस्थेची भव्य स्वच्छता मोहीम

Bundelikhabar

9 / 100 SEO Score

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शनिवार, दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी जगभरात जागतिक स्वच्छता दिवस साजरा केला जातो, याचनिमित्ताने ‘फ़ॉर फ़्यूचर इंडिया’ संस्थेने मुंबई येथील गोराई समुद्रकिनारी तर मिरा भाईंदर शहरातील उत्तन व वेलंकनी समुद्रकिनारी तसेच जंजिरे धारावी व गोडबंदर किल्यांवर स्वच्छता मोहित राबविण्यात आली. या भव्य स्वच्छता अभियानात मुंबई महानगरपालिका, मिरा भाईंदर महानगरपालिका, महाराष्ट्र वन विभाग, मॅन्ग्रोव्हस फौंडेशन, जंजिरे धारावी जतन समिती, राष्ट्रीय सेवा योजना, जागतिक स्वच्छता दिन फौंडेशन, माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण यांचे विशेष सहकार्य होते.

मुंबई येथील गोराई समुद्रकिनारी राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात ८५० हुन अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेत १५ टन हुन अधिक इतका कचरा काढला. यावेळी स्थानिक आमदार श्री. सुनील राणे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मा. उपायुक्त (परिमंडळ-7) भाग्यश्री कापसे मॅडम, सहायक आयुक्त श्री. निवृत्ती गोंधळी, कार्यकारी अभियंता श्री. ललित तेलेकर, सहायक अभियंता श्री. संदीप म्हाळुणकर यांची उपस्थिती होती.

तर मिरा भाईंदर येथे उत्तन व वेलंकनी समुद्रकिनारी १९५० हुन अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेत ४० टन हुन अधिक कचरा काढला. तसेच यंदा जंजिरे धारावी जतन समितीच्या मदतीने शहरातील जंजिरे धारावी व गोडबंदर किल्यांवर सुद्धा स्वच्छता अभियान राबविण्यात आले या अभियानात सुद्धा ५५० हुन अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेत ६५० किलोहून अधिक कचरा काढला.
यावेळी अभिनेत्री मुग्धा गोडसे व अभिनेता राहुल देव, स्थानिक आमदार श्रीमती गीता जैन, मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त श्री. दिलीप ढोले, अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड, उपायुक्त (पर्यावरण) संजय शिंदे, उपायुक्त (सार्व. आरोग्य) रवी पवार, शहर अभियंता दिपक खांबित, वरिष्ठ पत्रकार व पर्यावरणप्रेमी धीरज परब यांची उपस्थिती होती.

फ़ॉर फ़्यूचर इंडियाचे संस्थापक व अध्यक्ष आणि मिरा भाईंदर “इंडियन स्वच्छता लीग” स्टार कॅम्पेनर हर्षद ढगे, जंजिरे धारावी जतन समितीचे श्रेयस सावंत, गोडबंदर येथील स्थानिक अनिकेत किनी तर संस्थेचे स्वयंसेवक ध्रुव कडारा, धैर्या होनराव, कुंदन सोळंकी, प्रज्ञा चिकणे, करण पवार, ललित सोळंकी, विशाल पांड्ये, जितेश खाटीक, अब्राहम मुरुगन, शॉन नूनस, अदिती शेजवाल, सौरभ कौशवाह, मानसी जाधव यांनी वेगवेगळ्या ५ ठिकाणी स्वच्छता अभियानाचे व्यवस्थापन करत २५ हुन अधिक शाळा, महाविद्यालय व स्वयंसेवी संस्थांच्या एकूण ३३५० हुन अधिक स्वयंसेवकांचा सहभाग घेत ५५ टन हुन अधिक कचरा काढला आणि या भव्य अभियानास यशस्वी केले.


Bundelikhabar

Related posts

सैनी इंडिया का रिकॉर्ड प्रदर्शन

Bundeli Khabar

साधन केंद्र अनगांव येथे महिला किसान दिन मोठ्या उस्ताहात संपन्न

Bundeli Khabar

मीरा भाईंदर–वसई विरार क्राइम ब्रांच पुलिस ने दो गांजा तस्कर को किया गिरफ्तार।

Bundeli Khabar
error: Content is protected !!