मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : डायनॅमिक युथ स्पोर्ट्स अकॅडमी, इंडिया यांच्या वतीने अभिमान महाराष्ट्राचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार वितरण सोहळा आद्य क्रांतिवीर बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यामध्ये तायक्वांदो या क्रीडाप्रकारात केलेल्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल सर्वोत्तम प्रशिक्षक म्हणून पुण्याचे शारीरिक शिक्षक व तायक्वांदो प्रशिक्षक विजय बामुगडे यांना सन्मानित करण्यात आले.
सदर सोहळ्यास अर्जुन पुरस्कार व पद्मश्री पुरस्कार विजेता (हॉकी) एलिझा नेल्सन, अभिनेते शशिकांत केरकर, अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर, यामिनी महामुनकर, दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते भास्कर करकेरा (तायक्वांदो) आदी उपस्थित होते.