40.1 C
Madhya Pradesh
May 18, 2024
Bundeli Khabar
Home » वर्दितला माणूस मुंबई पोलीस
महाराष्ट्र

वर्दितला माणूस मुंबई पोलीस

बेखौफ भारतीय
दिनांक : मुंबई पोलीस म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहते ते बलदंड, मजबूत बांध्याचा ,रांगडा मिशीला पिळ देणारे धारधार व्यक्तीमत्व. अशा मुंबई पोलिसांच्या तत्परतेमुळे जनसामान्यांच्या, वरिष्ठ नागरिक ,महिला ,युवती,लहान मुले मुली ,जनतेच्या रक्षणासाठी ऑन ड्युटी २४ तास स्वत:ला वाहून घेतल्यामुळे मुंबई नगरीत वरील सर्वच बिनधास्त रात्री अपरात्री फीरू शकतात .कारण त्या बिनधास्त फिरणार्यांना माहीत असतं की, मुंबई पोलीस हा ऑन ड्युटी २४ तास डोळ्यात तेल घालून आपल्यासाठी सतर्क ,दक्ष असतात .

पण सध्या काळ बदललाय. नागरिकांच्या रक्षणासाठी सदैव दक्ष , तत्पर असणारे मुंबई पोलीस कुठेतरी असुरक्षित असल्याचे वाटू लागलयं. याचं कारणही तसेच आहे. त्यांच्यावर होणारे अनपेक्षित हल्ले , छोट्याश्या शुल्लक प्रसंगावरून त्यांना होणारी शिवीगाळ,अपमानास्पद वागणूक तरीही हा मुंबई पोलीस कायदा व सुव्यवस्था बिगडूनये म्हणून संयम राखून असतो .पण त्याला पण मर्यादा असतात. मुंबई पोलीसांनी का म्हणून हे सर्व चुक नसताना व स्वत:चे कर्तव्य बजावताना सहन करायचे.कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून कोणाला कीती आणि का सांभाळून घ्यायचे यालाही काही मर्यादा असतात.हल्ली तर छोट्या छोट्या गोष्टी वरून मुंबई पोलीसांबरोबर नाहक वाद घातला जातो व आजूबाजूला जमलेल्यांसमोर आरडाओरडा करून चढ्या आवाजात त्यांना शिव्या घालतात ,अंगावर येतात व हे बघणारे नागरिक बघ्याची भुमिका घेत मुक पणे तमाशा बघत असतात.ह्यावेळी मुंबई पोलिसांच्या बाजूने कोणीही बोलत नाही.
हे सर्व थांबले पाहिजे. कारण मुंबई पोलीस हा मुंबई चा अविभाज्य घटक आहे. त्यांच्यामुळे आपण रात्री- बेरात्री आपण बिनधास्त फिरू शकतो.हे नागरिकांनी लक्षात ठेवलेच पाहीजे.आपण सर्वांनी मुंबई पोलिसांच्या बाजूने त्यांच्या संकटकाळी खंबीर पणे उभे राहिले पाहिजे. कारण मुंबई पोलीस हा मुंबई सर्व जनसामान्यांच्या, महिलांचा ,युवतींचा ,वरिष्ठ नागरिकांचा, लहान मुलांचा ,नागरिकांचा रक्षक आहे.त्यांच्यावर होणारे हल्ले, शिव्यागाळ , त्यांच्या बरोबर होणारे गैरवर्तन ह्यांच्या विरोधात नुसती बघ्याची भुमिका न घेता त्यांच्याबाजुने ठामपणे उभे राहिले पाहिजे.

Related posts

खासदार संजय राऊत यांनी केले पत्रकार संघाच्या उपक्रमांचे कौतुक

Bundeli Khabar

पौधारोपण कर गायत्री परिवार सदस्यों ने लिया पर्यावरण की रक्षा का संकल्प

Bundeli Khabar

जब्बार’ च्या माणूसकीला व्हाट्सअप गृप चा ‘सलाम हिंदुस्मशानभूमिला मुस्लीम युवकाचा आधार, 51 हजारांचा मदतनिधी जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते सुपूर्द

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!