28.9 C
Madhya Pradesh
May 19, 2024
Bundeli Khabar
Home » टाटा आयपीएल – राजस्थान रॉयल्सचा २९ धावांनी विजय
खेल

टाटा आयपीएल – राजस्थान रॉयल्सचा २९ धावांनी विजय

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आपीएल २०२२ चा एकोणचाळीसवा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात पुण्याच्या एम. सी. ए. स्टेडियमवर खेळवण्यात आला. राजस्थान रॉयल्सने हा सामना २९ धावांनी जिंकला. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले.

राजस्थान रॉयल्सकडून रियान परागने ३ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने ३१ चेंडूंत बिनबाद ५६ धावा काढल्या. कर्णधार संजू सॅमसनने २७ धावा काढल्या. वाणिंदू हसरंगाने त्याचा त्रिफाळा उध्वस्त केला. रवीचंद्रन अश्विनला १७ धावांवर स्वतःच्याच गोलंदाजीवर महंमद सिराजने झेलबाद केले. डेरील मिशेलला १६ धावांवर जोश हेझलवूडने बाद केले. सलामीच्या आणि तळाच्या फलंदाजांकडून विशेष योगदान न मिळाल्यामुळे राजस्थान रॉयल्स १४४/८ इतकीच धावसंख्या उभारू शकला. जोश हेझलवूडने ४-१-१९-२, वाणिंदू हसरंगाने ४-०-२३-२, महंमद सिराजने ४-०-३०-२, हर्षल पटेलने ४-०-३३-१ यांनी गडी बाद केले.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून सर्वाधिक धावा कर्णधार फाफ ड्यू प्लेसिसने काढल्या. ३ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने २१ चेंडूंत २३ धावा काढल्या. वाणिंदू हसरंगाने १८ धावा काढल्या. त्याला कुलदीप सेनने स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. शाहबाझ अहमदने १७ धावा काढल्या. त्याला रवीचंद्रन अश्विनने बाद केले. रजत पाटिदारने १६ धावा काढल्या. त्याचा त्रिफाळा रवीचंद्रन अश्विनने उध्वस्त केला. इतर फलंदाजांकडून विशेष योगदान न मिळाल्यामुळे बेंगळुरूचा अवघा संघ केवळ ११५ धावांमध्ये परतला होता आणि राजस्थान रॉयल्सने २९ धावांनी विजय प्राप्त केला. कुलदीप सेनने ३.३-०-२०-४, रवीचंद्रन अश्विनने ४-०-१७-३, प्रसिद्ध कृष्णाने ४-०-२३-२ यांनी गडी बाद केले. राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी कमी धावसंख्या असतानाही सामना कसा जिकता येऊ शकतो याचा आदर्श वस्तूपाठ घालून दिला. येणाऱ्या काळात सारेच मार्गदर्शक हा सामना आपल्या विद्यार्थांना परत परत बघण्यासाठी सांगतील, रियान परागला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने बिनबाद ५६ धावा काढल्या होत्या.

उद्या गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघ हा सामना जिंकून गुणतक्त्यात पहिलं स्थान पटकवण्याचा प्रयत्न करतील.

Related posts

Judo Federation of India’s National Judo Competition

Bundeli Khabar

टाटा आयपीएल – राजस्थान रॉयल्सचे निर्विवाद वर्चस्व

Bundeli Khabar

टाटा आयपीएल – गुजरात टायटन्सचा ६२ धावांनी विजय

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!