29.4 C
Madhya Pradesh
September 29, 2026
Bundeli Khabar
IMG 20220426 WA0012
महाराष्ट्र

`संगीतकार अशोक पत्की’ लघुपटाचे दूरदर्शनवर ६ व ७ मे रोजी प्रसारण

Bundelikhabar

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई दूरदर्शनच्या वतीने `शब्दसूरांचा जादूगार संगीतकार अशोक पत्की’ या लघुपटाची निर्मिती केली आहे. त्याचे प्रसारण शुक्रवार दिनांक ६ मे रोजी सायंकाळी साडे सात वाजता आणि शनिवार दिनांक ७ मे रोजी दुपारी १.३० व रात्री १०.३० वाजता होईल. दूरदर्शनच्या माजी सहाय्यक संचालक निर्मात्या डॉ. किरण चित्रे यांनी त्याचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. यासाठी दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक नीरज आगरवाल यांचे सहकार्य मिळाले आहे.

अशोक पत्की हे संगीत विश्वातलं मोठं नाव, शास्त्रशुद्ध पद्धतीने संगीताचे शिक्षण न घेताही स्वकर्तृत्वाच्या बळावर त्यांनी संगीत क्षेत्रात अफाट आणि वैविध्यपूर्ण काम केले आहे. त्यांच्या सांगितिक जीवनाची यशोगाथा रसिकांसमोर यावी, यासाठी या लघुपटाचे संकलन प्रफुल्ल मोहिते यांनी केले आहे तर संकलन प्रमुख शुभांगी सावंत यांनी समन्वयकाची जबाबदारी पार पाडली आहे. सहयाद्री वाहिनीच्या यु ट्युब चॅनेल आणि फेसबुकवरदेखील लाईव्ह स्ट्रिमिंग स्वरुपात हे प्रसारण उपलब्ध असेल.


Bundelikhabar

Related posts

मोहने येथील शांताराम पाटील शाळा येथे मोफत अँटीजेन आणि आरटी- पीसीआर टेस्ट उपलब्ध

Bundeli Khabar

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कटिबद्ध राहिल्यामुळे या शिक्षण संस्था उभारल्या गेल्या- विजय जाधव

Bundeli Khabar

नकली पुलिस का कारनामा: लाखों के जेबर ले कर रफूचक्कर

Bundeli Khabar
error: Content is protected !!