29.4 C
Madhya Pradesh
May 10, 2024
Bundeli Khabar
Home » टाटा आयपीएल – पंजाब किंग्जचा नियोजनबद्ध विजय
खेल

टाटा आयपीएल – पंजाब किंग्जचा नियोजनबद्ध विजय

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आपीएल २०२२ चा अडतीसवा सामना पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. पंजाब किंग्जने हा सामना ११ धावांनी जिंकला. चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. पंजाब किंग्सकडून कर्णधार मयंक अगरवाल आणि शिखर धवन सलामीला उतरले. मयंक अगरवालला महेश ठिकशानाने १८ धावांवर बाद केले. भानुका राजपक्षाला दोनदा जीवदान मिळूनही मोठी खेळी साकारता आली नाही. ड्वेन ब्राव्होने त्याला ४२ धावांवर बाद केले. ड्वेन ब्राव्होने टाकलेल्या २०व्या षटकात दोन गडी बाद झाले. लिअम लिव्हिंगस्टोनने झटपट १९ धावा काढल्या. जॉनी ब्रेस्ट्रोला मिशेल सेंटनरने ६ धावांवर धावबाद केले. पंजाबचा सलामीचा फलंदाज शिखर धवनने सर्वाधिक धावा काढल्या. त्याने ९ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने ५९ चेंडूंत बिनबाद ८८ धावा काढल्या. पंजाबच्या संघाने २०व्या षटकाच्या अखेरीस १८७/४ असा धावांचा डोंगर उभारला. ड्वेन ब्राव्होने ४-०-४२-२, महेश ठिकशानाने ४-०-३२-१ यांनी गडी बाद केले.

प्रत्युत्तरादाखल चेन्नई सुपर किंग्सकडून अंबाती रायडूने ७ चौकार आणि ६ षटकार यांच्या सहाय्याने ३९ चेंडूंत ७८ धावा काढल्या. त्याचा त्रिफाळा कगिसो रबाडाने उध्वस्त केला. ऋतुराज गायकवाडला कगिसो रबाडाने ३० धावांवर बाद केले. कर्णधार सर रवींद्र जडेजाने संथ गतीने बिनबाद २१ धावा काढल्या. मुंबईच्या सामन्यात स्टार परफॉर्मर ठरलेला महेंद्रसिंग धोनी संघाला गरज असताना केवळ १२ धावांवर ऋषी धवनच्या गोलंदाजीवर बाद झाला. चेन्नईच्या संघाने २०व्या षटकाच्या अखेरीस १७६/६ इतकीच मजल मारली. कगिसो रबाडाने ४-०-२३-२, ऋषी धवनने ४-०-३९-२, अर्शदीप सिंगने ४-०-२३-१, संदीप शर्माने ४-०-४०-१ यांनी गडी बाद केले. आणि पंजाब किंग्जने नियोजनबद्ध पद्घतीने विजय साकारला.
शिखर धवनला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने बिनबाद ८८ धावा काढल्या होत्या.

उद्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात पुण्याच्या एम. सी. ए. स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघ हा सामना जिंकून गुणतक्त्यात दुसरं स्थान पटकवण्याचा प्रयत्न करतील.

Related posts

टाटा आयपीएल – चेन्नई सुपर किंग्सने मिळवला ह्या मोसमातील मोठा विजय

Bundeli Khabar

जूडो फेडरेशन ऑफ इंडियाके राष्ट्रीय जूडो प्रतियोगिता का शानदार समापन

Bundeli Khabar

एशिया ने प्राप्त किया दौड़़ प्रतियोगिता में तीसरा स्थान

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!