29.3 C
Madhya Pradesh
May 14, 2024
Bundeli Khabar
Home » टाटा आयपीएल – लखनौ सुपर जायंट्सचा जायंट विजय
खेल

टाटा आयपीएल – लखनौ सुपर जायंट्सचा जायंट विजय

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आयपीएल २०२२ चा आजचा दुसरा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकात्ता क्नाईट रायडर्स यांच्यात पुण्याच्या एम. सी. ए. स्टेडियमवर खेळवण्यात आला. लखनौ सुपर जायंट्सने ७५ धावांनी हा सामना जिंकला. लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षकण स्वीकारलं. लखनौ सुपर जायंट्सकडून यष्टिरक्षक क्विंटन डी कॉक याने सर्वाधिक धावा काढल्या. त्याने ४ चौकार आणि ३ षटकार यांच्या सहाय्याने २९ चेंडूंत ५० धावा काढल्या. त्याला सुनील नारायणने बाद केले. कर्णधार के. एल. राहुल एकही चेंडू न खेळता श्रेयस अय्यर कडून धावबाद झाला. दिपक हुडाने ४ चौकार आणि २ षटकार यांच्या सहाय्याने २७ चेंडूंत ४१ धावा काढल्या. त्याला आंद्रे रसेलने बाद केले. मार्कस स्टॉईनीसने १ चौकार आणि ३ षटकार यांच्या सहाय्याने १४ चेंडूंत २८ धावा काढल्या. त्याला शिवम मावीने बाद केले. कृणाल पांड्याला २५ धावांवर आंद्रे रसेलने बाद केले. आयुष बदोनी १५ धावांवर नाबाद राहिला. लखनौ सुपर जायंट्सने २०व्या षटकाच्या अखेरीस १७६/७ असा धावांचा डोंगर उभारला. आंद्रे रसेलने २२/२, टीम साऊदी, सुनील नारायण आणि शिवम मावी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केले.

हा धावांचा डोंगर पाहून कोलकात्ता क्नाईट रायडर्सच्या तळपायाची जमीनच सरकली. आंद्रे रसेलने ३ चौकार आणि ५ षटकार यांच्या सहाय्याने १९ चेंडूंत ४५ धावा काढल्या. त्याला आवेश खानने बाद केले. सुनील नारायणने ३ चौकार आणि १ षटकार यांच्या सहाय्याने १२ चेंडूंत २२ धावा काढल्या. त्याला जेसन होल्डरने बाद केलं. अरॉन फिंचला १४ धावांवर जेसन होल्डरने बाद केलं. बाकीच्या फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही स्वतःच्या नावासमोर झळकवता आली नाही. त्यामुळेच कोलकत्याच्या संपूर्ण संघ १०१ धावांमध्ये तंबूत परतला होता आणि एक लाजिरवाणा पराभव स्वीकारला. आवेश खानने १९/३, जेसन होल्डरने ३१/३, रवी बिष्णोई, मोहसीन खान आणि दुष्मंथा चमिरा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केले. गोलंदाजांच्या निर्णायक कामगिरीमुळे लखनौने ७५ धावांनी हा सामना जिंकला आणि गुणतक्त्यात पहिल्या क्रमांकावर विराजमान झाले.

यशस्वी जयस्वालला सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्याने १९ धावांमध्ये ३ गडी बाद केले होते. उद्याचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहे. बेंगळुरू आणि दिल्ली आपलं गुणतक्त्यातलं अनुक्रमे चौथं आणि पाचवं स्थान कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील.

Related posts

इंग्लंडने १० गडी राखून केला भारताचा दारूण पराभव

Bundeli Khabar

भारताचा वेस्ट इंडिजवर ८८ धावांनी विजय

Bundeli Khabar

अर्जेंटिना ३६ वर्षानंतर पुुन्हा विश्वविजेते

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!