29.4 C
Madhya Pradesh
May 10, 2024
Bundeli Khabar
Home » राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेत राघव, मुझफ्फर, यश यांची प्रेक्षणीय कामगिरी
खेल

राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेत राघव, मुझफ्फर, यश यांची प्रेक्षणीय कामगिरी

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र ज्युडो संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४८ व्या राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेचे शानदार आयोजन करण्यात आले. सब ज्युनिअऱ आणि कॅडेट यांच्या विविध गटांमध्ये स्पर्धा झाल्या. सर्व गटातील विजेते खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत. राघव सेन्थिल्वेल, मुझफ्फर फारूख, यश मुकेश यांची कामगिरी प्रेक्षकांच्या लक्षात राहिली.
महाराष्ट्र ज्युडो संघटनेचे अध्यक्ष धनंजय भोसले आणि महासचिव शैलेश टिळक यांच्या संयोजनाखाली स्पर्धेचे शानदार आयोजन दत्ता आफळे, कावस बिलिमोरिया, यतीश बंगेरा, रवी पाटील, गौतम पाटील, डॉ. अशोक पाटील, राहुल सोनावणे, चंद्रशेखर साखरे तसेच संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य यांनी उत्तमरित्या केले.
सब ज्युनिअर वर्गवारीतील मुलांच्या गटातील पहिल्या तीन विजेत्यांची यादी अशी – ६६ किलो आणि वरील – आर्यन माल (मुंबई), स्वराज लाड (पीडीजेए), रोहित रमेश (वर्धा), ६० ते ६६ किलो – राघव सेन्थिल्वेल (मुंबई), मुझफ्फर फारूख (कोल्हापूर), यश मुकेश (अहमदनगर), ५५ ते ६० किलो – दर्श दिलीप (मुंबई), तेजस तुषाऱ (ठाणे), व्यंकटेश सुधीर (कोल्हापूर).
सब ज्युनिअर वर्गवारीतील मुलींच्या गटातील पहिल्या तीन विजेत्यांची यादी – ५७ किलो आणि वरील – खुशी प्रमिल (मुंबई), मिनल अनिष (गोंदिया), प्रतिक्षा उमेश (नाशिक), ५२ ते ५७ किलो – समीक्षा सचिन (कोल्हापूर), रेया मेहेंदळे (मुंबई), अंजली बालाजी (क्रीडा प्रबोधिनी), ४८ ते ५२ किलो – श्रेया संतोष (ठाणे), वैष्णवी हिम्मत (नाशिक), रसिका नितीन (धुळे), श्वेता संजय (कोल्हापूर).
कॅडेट वर्गवारीतील मुलांच्या गटातील पहिल्या तीन विजेत्यांची यादी अशी – ५० किलो – अनमोल पालकर (कोल्हापूर), मोहित मुळ्ये (ठाणे), साबीर चव्हाण (यवतमाळ), ५५ किलो – सागर जाधव (यवतमाळ), प्रणित गोडसे (क्रीडा प्रबोधिनी), राजन गुप्ता (मुंबई), ६० किलो – अथर्व चव्हाण (पीडीजेए), महेश माने (क्रीडा प्रबोधिनी), प्रेम किरवे (मुंबई), ६६ किलो – ईशान सोनावणे (नाशिक), सुभम शिद (पीजेए), सन्नी रणमाळे (कोल्हापूर), ७१ किलो – ईशान धाडवे (पीडीजेए), संभाजी देवकर (औरंगाबाद), हर्ष शिंपी (जळगांव), ८१ किलो भालाजी ए. एस. (पीडीजेए), आयान खान (मुंबई), हर्षवर्धन गाडेकर (कोल्हापूर), ९० किलो – आर्यन देसाई (कोल्हापूर), गणेश मासलकर (बीड), अमृत उंद्रे (पीजेए), ९० किलो – आदित्य परब (पीडीजेए), हितेन बुतोला (ठाणे), पियुष मेश्राम (अमरावती).
कॅडेट वर्गवारीतील मुलींच्या गटातील पहिल्या तीन विजेत्यांची यादी अशी – ४० किलो – मिथिला भोसले (ठाणे), प्रेरणा शेलार (क्रीडा प्रबोधिनी), जान्हवी जाधव (पीडीजेए), ४४ किलो – श्रद्धा चोपडे (औरंगाबाद), श्वेता डांगरे (नागपूर), तेजस्विनी पाटील (कोल्हापूर), ४८ किलो – आकांक्षा शिंदे (नाशिक), वैष्णवी पाटील (कोल्हापूर), पद्मजा अय्यर (ठाणे), ५२ किलो दिशा खरे (गोंदिया), मधुरा कुलकर्णी (नागपूर), मंजिरी बास्ते (नाशिक), ५७ किलो – शायना देशपांडे (ठाणे), ईशिता सोनावणे (नाशिक), समृद्धी पाटील (कोल्हापूर), ६३ किलो ) गौतमी कांचन (पीडीजेए), श्रृती ठाकूर (लातूर), तनुजा वाघ (नाशिक), ७० किलो – समीक्षा शेलार (क्रीडा प्रबोधिनी), संस्कृती पाटील (कोल्हापूर), आंचल मौर्या (मुंबई), ७० किलो – शिवानी कापसे (वर्धा), युक्ता नाचणे (अमरावती), सुमेधा पाठारे (औरंगाबाद).

Related posts

गोलंदाजांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने साजरी केली विजयाची हॅट्ट्रिक

Bundeli Khabar

पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेवर ६७ धावांनी दणदणीत मा

Bundeli Khabar

टाटा आयपीएल – अटीतटीच्या लढतीत लखनौची सरशी

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!