31.1 C
Madhya Pradesh
May 17, 2024
Bundeli Khabar
Home » ‘वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्रॅम्स’ अतंर्गत कर्मचाऱ्यांसाठी कौशल्य प्रशिक्षण
महाराष्ट्र

‘वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्रॅम्स’ अतंर्गत कर्मचाऱ्यांसाठी कौशल्य प्रशिक्षण

संतोष साहू,

मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी मध्ये बी.टेक,ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग -एम.टेक करण्याची ‘कमिन्स इंडिया’ कर्मचाऱ्यांना संधी

मुंबई। कर्मचाऱ्यांना विशिष्ट शैक्षणिक कार्यक्रमाद्वारे शिकण्याची संधी मिळावी व त्यांच्यात शिकणे व कौशल्यवाढ करणे यांची संस्कृती जोपासली जावी, या हेतूने ‘कमिन्स इंडिया’ने ‘बिट्स पिलानी’ या संस्थेच्या ‘वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्रॅम्स’ (डब्ल्यूआयएलपी) या विभागाशी सहयोग साधला आहे. हा उपक्रम ‘कमिन्स इंडिया’ने प्रायोजित केला असून यातील बी.टेक आणि एम.टेक या अभ्यासक्रमांमुळे पहिल्या आणि ‘शॉप फ्लोअर’वरील कर्मचारी यांना व्यावसायिक पदव्या मिळू शकणार आहे.
‘कमिन्स इंडियाच्या’ ४० कर्मचाऱ्यांच्या प्राथमिक तुकडीने ऑगस्ट २०१७ मध्ये बी.टेक अभ्यासक्रमामध्ये नावनोंदणी करून ही भागीदारी सुरू केली. तेव्हापासून, ८५ कर्मचार्यांच्या दोन तुकड्यांनी बी.टेक आणि एम.टेक पदव्या यशस्वीरित्या प्राप्त केल्या आहेत. या दोन्ही अभ्यासक्रमांमध्ये नावनोंदणी केलेले कर्मचारी वस्तुनिर्माण, अभियांत्रिकी, खरेदी, गुणवत्ता नियंत्रण, विपणन आणि पुरवठा साखळी यांसारख्या महत्त्वपूर्ण विभागांतीस निवडक गटांतील आहेत.‘बिट्स पिलानी’चा डब्ल्यूआयएलपी हा ‘कमिन्स इंडिया’ साठीचा एक विशिष्ट अभ्यासक्रम आहे. आपल्या करिअरमध्ये खंड न पाडता भारतातील एका सर्वोच्च संस्थेतून अभियांत्रिकीची पदवी संपादन करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास या अभ्यासक्रमामुळे कर्मचारी सक्षम होतात, त्यांना वैविध्यपूर्ण ज्ञान आणि दृष्टीकोन यांचा लाभ होतो. त्यातून त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासात महत्त्वपूर्ण मूल्यांची भर पडते. ‘बिट्स पिलानी’च्या डब्ल्यूआयएलपी या अभ्यासक्रमामुळे एक लाखांहून अधिक कार्यरत व्यावसायिक आयटी व आयटीईएस, वाहन, वस्तुनिर्माण, औषधनिर्मिती, रसायने धातू व खाणकाम यांसारख्या उद्योगांमध्ये कारकिर्दीसाठी उपयुक्त अशा प्रगत कौशल्यांनी सुसज्ज झाले आहेत.
अनुपमा कौल, मनुष्यबळ विभाग प्रमुख, कमिन्स इंडिया म्हणाल्या, “आमच्या ‘हायर-टू-डेव्हलप’ या तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने आणि कमिन्स ही खरी शिक्षण संस्था बनावी यासाठी, आम्ही कर्मचार्यांच्या विकासाच्या प्रक्रियेत विविध मार्गांनी सतत गुंतवणूक करीत असतो. कर्मचार्यांसाठी प्रायोजित स्वरुपाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमामधील गुंतवणूक ही अशाच अनेक उपक्रमांपैकी एक आहे. यामध्ये औपचारिक शिक्षण सुरू ठेवण्यासाठी सहज स्वीकारता येण्याजोगे पर्याय समाविष्ट आहेत. कर्मचार्यांना सर्वांगीण शिक्षणाचा अनुभव मिळवून देण्यासाठी ‘बिट्स पिलानी’ तर्फे अनोखा ‘वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्रॅम’ (डब्ल्यूआयएलपी) खास तयार करण्यात आला आहे. बिट्सने आम्हाला याकरीता दिलेल्या सहकार्याचे आम्ही स्वागत करतो या शैक्षणिक उपक्रमाचे कर्मचार्यांसाठी खूप महत्त्व आहे आणि त्यांना त्याचा प्रचंड फायदा झाला आहे.”
प्रा. जी. सुंदर (संचालक -ऑफ-कॅम्पस प्रोग्रॅम्स अँड इंडस्ट्री एंगेजमेंट, बिट्स पिलानी) म्हणाले, “कमिन्स इंडिया या आघाडीच्या वस्तुनिर्माण कंपनीशी सहकार्य करताना आम्हाला अभिमान आणि आनंद वाटतो. बिट्स पिलानीमध्ये आम्ही विविध क्षेत्रातील संस्थांसाठी आवश्यक तांत्रिक क्षमता वाढवण्याकरीता योग्य असे कार्यक्रम तयार करण्याचा आणि ते प्रस्तावित करण्याचा सतत प्रयत्न करीत असतो. तसेच, कार्यरत व्यावसायिकांना अभ्यासासाठी खास पगारी रजा घ्यावी न लागता वैयक्तिक कारकिर्दीच्या वाढीस मदत होईल अशी तजवीज आम्ही करून देतो.”

Related posts

मराठा समाजातील तरुणांना व्यावसायिक होण्यासाठी आवाहन

Bundeli Khabar

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाकरिता पोटनिवडणूक – २०२२ कार्यक्रम जाहीर

Bundeli Khabar

अत्यावश्यक सेवांमध्ये राज्यातील पत्रकारांचा समावेश व लोकल प्रवास अनुमति साठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!