34.4 C
Madhya Pradesh
May 18, 2024
Bundeli Khabar
Home » टाटा आयपीएल – अखेर पंजाबच ठरले किंग
खेलव्यापार

टाटा आयपीएल – अखेर पंजाबच ठरले किंग

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आपीएल २०२२ चा तेवीसावा सामना मुंबई इंडिअन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात पुण्याच्या एम. सी. ए. स्टेडियमवर पंजाब किंग्सने १३ धावांनी जिंकला. आणि गुणतक्त्यात तिसर्‍या स्थानावर धडक मारली. मुंबई इंडिअन्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. पंजाबकडून खेळाची सुरूवात करायला कर्णधार मयंक अगरवाल आणि शिखर धवन उतरले. दोघांच्याही टप्प्यात चेंडू येत होता आणि ते धावा वसूल करत होते. १०व्या षटकात चांगली फलंदाजी करत असताना मुरूगन अश्विनने मयंक अगरवालला ५२ धाव‍ांवर बाद केले. जॉनी बेअरस्ट्रोला जयदेव उनाडकडने केवळ १२ धावांवर तंबूत परत पाठवले. लिअाम लिव्हिंगस्टोनचा जसप्रीत बुमराहने त्रिफाळा उध्वस्त केला. एका बाजूने किल्ला लढवत असणार्‍या शिखर धवनला ७० धावांवर बासील थंम्पीने बाद केले. शाहरूख खानने झटपट १५ धावा काढल्या. बासील थंम्पीने त्याचा त्रिफाळा उध्वस्त केला. जितेश शर्माने बिनबाद ३० धावा काढल्या. ओडिअन स्मिथने बिनबाद १ धाव काढली. पंजाब किंग्स १९८/५ असे स्थिरावले.

मुंबई इंडिअन्सकडून खेळाची सुरूवात करायला कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन उतरले. रोहित झटपट धावा जमवत होता. चौथ्या षटकात कगिसो रबाडाने २८ धावांवर त्याला बाद केले. पुढच्याच षटकात वैभव अरोराने ईशान किशनला बाद केले. डिवाल्ड ब्रेविसला ओडिअन स्मिथने ४९ धावांवर बाद केले. तिलक वर्मा चांगला खेळत असताना एक चोरटी धाव घेताना धावबाद झाला. किरॉन पोलार्डही झटपट धावबाद झाला. सूर्यकुमार यादव चांगला खेळत असताना कगिसो रबाडाने ४३ धावांवर त्याला बाद केले. ओडिअन स्मिथने २०व्या षटकात ३ बळी टिपले. आणि मुंबईची धावसंख्या १८६/९ अशी मर्यादित ठेवली. आज पुन्हा मुंबईचा संघ आपल्या लौकिकाप्रमाणे खेळला नाही त्यामुळे त्यांना सलग ५वा पराभव बघावा लागला.

मयंक अगरवालला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला. त्याने ५२ धावा काढल्या होत्या. उद्याचा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणार आहे. दोन्ही संघ विजयासाठीच प्रयत्न करतील कारण जो सामना जिंकेल तो संघ ८ गुणांसह गुणतक्त्यात पहिल्या क्रमांकावर पोहचेल.

Related posts

टाटा आयपीएल – बेंगळुरू १४ धावांनी विजयी

Bundeli Khabar

हरमनप्रीत दीडशे टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी जगातील पहिली क्रिकेटपटू

Bundeli Khabar

८६% शाळांचा आपल्या ईकोसिस्टमचे डिजिटायझेशन करण्याकडे कल: सर्वेक्षण.

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!