34.8 C
Madhya Pradesh
May 4, 2024
Bundeli Khabar
Home » हरमनप्रीत दीडशे टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी जगातील पहिली क्रिकेटपटू
खेल

हरमनप्रीत दीडशे टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी जगातील पहिली क्रिकेटपटू

*भारत तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत! डकवर्थ लुईस नियमानुसार आयर्लंडवर पाच धावांनी विजय*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी महिला टी२० विश्वचषक स्पर्धेत सोमवारी भारताने डकवर्थ-लुईस नियमानुसार आयर्लंडवर पाच धावांनी विजय मिळविला. भारताने सलग तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत धडक मारली. विजयासाठी १५६ धावांचा पाठलाग करताना आयर्लंडला ७० चेंडूंत १०२ धावांची आवश्यकता असताना पावसाला सुरुवात झाली. खेळ थांबविण्यात आला. यावेळी आयर्लंडने ८.२ षटकांत २ बाद ५४ धावा केल्या होत्या. भारताने ८.२ षटकांत बिनबाद ५९ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताला पाच धावांनी विजयी घोषित करण्यात आले.

त्याआधी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात शानदार झाली. स्मृती मंधानाच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने निर्धारित २० षटकांत ६ बाद १५५ धावा केल्या. मंधानाने ५६ चेंडूंना सामोरे जात ९ चौकार आणि ३ षटकार लगावत ८७ धावा केल्या. त्यामुळे भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात यश आले. मानधनाने शफाली वर्मासोबत ६२ धावांची सलामी दिली. दहाव्या षटकातीत तिसऱ्या चेंडूवर कर्णधार लॉरा डेनालीच्या गोलंदाजीवर शफाली वर्मा (२९ चेंडूंत २४) ॲमी हंटरमार्फत झेलबाद झाली.

पहिल्या विकेटच्या दमदार भागीदारीनंतर कर्णधार लॉरा डेनालीच्या षटकात कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि रिचा घोष या दोन फलंदाज बाद झाल्या. हरमनप्रीत सिंगने २० चेंडूंत १३ धावांचे योगदान दिले; तर रिचा घोषला भोपळाही फोडता आला नाही. अन्य फलंदाजांना विशेष काही करता आले नाही. त्या झटपट बाद झाल्या. आयर्लंड संघाकडून कर्णधार लॉरा डेनालीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. ओर्ला डरगास्टने दोन विकेट्स मिळविल्या. आर्लेन केलीने एक विकेट मिळविली.भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने महिला विश्वचषक स्पर्धेत मैदानात उतरताच हरमनप्रीत दीडशे टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी जगातील पहिली क्रिकेटपटू ठरली. जगातील कोणताही क्रिकेटपटू (महिला किंवा पुरुष) आतापर्यंत हा आकडा गाठू शकलेला नाही. या खास क्षणी हरमनप्रीत भावुक झाली. हरमनप्रीत कौरनंतर न्यूझीलंडची फलंदाज सुझी बेट्स दुसऱ्या स्थानावर आहे. बेट्सने आपल्या कारकीर्दीत १४३ सामने खेळले आहेत. इंग्लंडची फलंदाज डेनी व्याट १४१ सामन्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे. टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४८ सामने खेळून रोहित शर्मा अव्वल स्थानावर आहे. विराट कोहली ११५ सामने खेळून सातव्या स्थानावर आहे. एम. एस. धोनीने त्याच्या कारकीर्दीत ९८ सामने खेळले. अशा प्रकारे हरमनप्रीत कौर या सर्व क्रिकेटपटूंच्या पुढे गेली.

स्मृती मंधानाने ५६ चेंडूंत ८७ धावा काढत सामनावीर ठरली.

भारत उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध भिडणार आहे.

Related posts

टाटा आयपीएल – दिल्ली कॅपिटल्सचा ८ गडी राखून विजय

Bundeli Khabar

राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत मुंबईच्या विन्स पाटील यांची सुवर्ण कामगिरी

Bundeli Khabar

टाटा आयपीएल – अखेर पंजाबच ठरले किंग

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!